Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात टोळक्याने बाटली फोडून हत्याराने वार करुन केले गंभीर जखमी, कोथरुड बसस्टँडमागील घटना

New Project (2)

पुणे : Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एका तरुणाच्या डोक्यात बाटली फोडून तसेच हत्याराने वार करुन त्याला गंभीर जखमी करण्याची घटना समोर आली आहे. कोथरुड पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

स्वरुप संघपाल आवटे (वय २१, रा. धावडे बिल्डिंग, एनडीए रोड, उत्तमनगर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. स्वरुप आवटे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कोथरुड बसस्टॅन्डच्या पाठीमागील बँक ऑफ बडोदाच्या जवळील सार्वजनिक स्वच्छतागृहासमोर २ नोव्हेंबर रोजी रात्री पावणे आठ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आवटे अणि आरोपींचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. आवटे रविवारी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास कोथरुड बस स्थानक परिसरातून जात होता. त्यावेळी टोळक्याने त्याला अडवले. शिवीगाळ करुन त्याच्यावर शस्त्राने वार केले. त्याच्या डोक्यात बाटली फोडून आरोपी पसार झाले. पोलीस हवालदार दळवी तपास करीत आहेत.

You may have missed