Pune Crime News | गर्लफ्रेंडला पाहून गाणे म्हटल्याच्या गैरसमुजतीतून तरुणाच्या डोक्यात टोळक्याने कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न, उत्तमनगर पोलिसांनी पाच जणांना अटक
पुणे : Pune Crime News | कोंढवे धावडे येथील पान टपरीवर रात्री थांबले असताना तरुणाने गाणे गुणगुणले. यावेळी आपल्या गर्लफ्रेंडकडे पाहून गाणे म्हटल्याचा गैरसमज करुन घेऊन टोळक्याने तरुणावर कोयत्याने डोक्यात, हातावर पायावर वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. उत्तमनगर पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.
करण गणपत वाशिलकर Karan Ganpat Vashilkar (वय २४), ओजी ऊर्फ रोहित गणेश मौर्य OG aka Rohit Ganesh Maurya (वय २४), टुण टुण गण्या गणेश सिद्धराम कालदिप Tun Tun Ganya Ganesh Siddharam Kaldeep (वय २०), आदित्य गणेश पवार Aditya Ganesh Pawar आणि बबलु शिवाजी कांबळे Bablu Shivaji Kamble (वय २२, सर्व रा. उत्तमनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या घटनेत प्रिन्स शैलेंद्र सिंग (वय २६, रा. भैरवनाथनगर,कोंढवे धावडे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कोंढवे धावडेमधील कोंढवा गेटजवळील मुस्कान पान शॉपजवळ ५ मार्च रोजी रात्री १० वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण वाशिलकर याचे धायरीमध्ये दुकान आहे. प्रिन्स सिंग हा मुस्कान पान शॉपजवळ थांबलेला होता. त्यावेळी करण वाशिलकर याला वाटले की प्रिन्स याने त्याच्या गर्लफ्रेंडला पाहुन गाणे म्हणाला. करण प्रिन्सकडे जाऊन तु गाणे कोणाकडे पाहून म्हणतो, असे विचारले. यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी करण व त्याच्या साथीदारांनी प्रिन्स याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गण्या कालदिप व आदित्य पवार यांनी त्यांच्याजवळील हत्याराने प्रिन्स याच्या डोक्यात, हातावर तसेच पायावर सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस निरीक्षक संगिता अल्फान्सो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंग क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पाचही जणांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक कुरेवाड तपास करीत आहेत.
