Pune Crime News | सोने कारागिराने 2 व्यापार्यांना लावला चुना; 42 लाखांचे सोने घेऊन फरार
पुणे : Pune Crime News | सोन्याचे दागिने घडविण्यासाठी दिलेले ४२ लाख रुपयांचे सोने घेऊन कारागिराने दोघा व्यापार्यांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली आहे.
याबाब मयुर प्रविणचंद सोनी (वय ४५, रा. रास्ता पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रमेश शंकर माईती (रा. रविवार पेठ, मुळ पश्चिम बंगाल)याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवार पेठेतील श्रीहरी ज्वेलर्स आणि जे एम ज्वेलर्स येथे १७ मार्च ते २३मार्च दरम्यान घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या ओळखीचे व्यापारी जॉयनाथ पारबोती यांच्या दुकानातील दागिने घडविण्याचे काम रमेश माईती यांच्याकडे दिले जात असे. त्याला दोघांनी मिळून ४२लाख २१ हजार १६८ रुपयांचे २२ कॅरेट वजनाचे ६२० ग्रॅम सोने दिले होते़ त्याचे दागिने घडविण्यास सांगितले होते. त्याने दागिने न घडविता ते सोने घेऊन तो पसार झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान
Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी
Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून
Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी बॅंक कर्मचाऱ्याला जामीन मंजूर