Pune Crime News | एकांतवासातील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाने अल्पवयीन मुलासोबत केले अश्लिल चाळे; दागिने गहाण ठेवण्यास सांगून पावणे सहा लाखांचा केला अपहार

Pune Crime News | A man who sexually abused a minor by threatening to make his solitary confinement photos viral, committed obscene acts with him; asked him to pawn his jewelry and embezzled Rs. 6 lakh

पुणे : Pune Crime News | महिलेशी ओळख वाढवून तिच्याबरोबरील एकांतवासातील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच अल्पवयीन मुलासोबत अश्लिल चाळे केले. सराफाकडे दागिने गहाण ठेवण्यास भाग पाडून ५ लाख ७० हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी या नराधमावर अ‍ॅट्रोसिटी व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

जावेद दस्तगिर खाटीक Javed Dastagir Khatik (रा. गारमाळ, धायरी) असे या नराधमाचे नाव आहे. हा प्रकार मे २०२० ते मे २०२५ दरम्यान घडला होता. याबाबत एका ३५ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याशी जावेद खाटीक याने ओळख निर्माण करुन जवळीक साधली. फिर्यादीचे एकांतवासातील मोबाईलमध्ये काढलेले फोटो फिर्यादी यांना दाखवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. फिर्यादी अनुसुचित जातीची असल्याचे माहिती असताना त्यांच्याशी वेळोवेळी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. फिर्यादी यांना त्यांचे दागिने सराफ दुकानात गहाण ठेवण्यास सांगून आलेले एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा अपहार केला. तसेच आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलासोबत अश्लिल चाळे केले. त्यानंतर आता या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अडागळे तपास करीत आहेत.

You may have missed