Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन केले गर्भवती; दोन घटनांमध्ये दोघांवर गुन्हा दाखल

rape-girl

पुणे : Pune Crime News | अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्याशी शारिरीक संबंध (Physical Relationship) ठेवल्याने त्यातून ती गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी अवि कालिदास पोपळघट Avi Kalidas Poplagat (वय २०, रा. संघर्ष चौक, वारजे माळवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आरोपीच्या राहते घरी २सप्टेबर २०२३ ते २० ऑगस्ट २०२४ दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन आहे, हे माहिती असताना अवि पोपळघट याने तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्या मित्राच्या व स्वत:च्या घरी नेऊन तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध ठेवले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेडगे तपास करीत आहेत.

दुसरी घटना मुंढवा परिसरात घडली. मुंढवा येथील एका १६ वर्षाच्या मुलीने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी भिमप्पा चंदगौरी मडीवाळ Bhimappa Chandgauri Madiwal (वय २१, रा. वडबन, ताडीगुत्ता रोड, मुंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पिडिताच्या परिसरात राहणार्‍या आरोपीने पिडिताचे जबरदस्तीने कपडे काढून तिच्यावर जबरी संभोग केला.
मार्च २०२४ चा पहिला आठवडा ते २५ मार्च २०२४ दरम्यान ५ ते ६ वेळा जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले.
याबाबत कोणाला वाच्यता केली तर पिडितेची व तिच्या आईवडिलांची बदनामी करेन म्हणून धमकावले.
या प्रकारातून ती गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला. सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Female Education Officer | 2 लाखांची लाच घेताना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात;
शासनाने दिलेले थकीत वेतन अधीक्षकांनी ठेवले अडवून

Market Yard Pune Crime News | 15 वर्षाच्या मुलीशी शारिरीक संबंध; त्याचा व्हिडिओ काढून 20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट;
म्हणाले, बाहेरून लोकं आणली, आंदोलन राजकीय प्रेरित…”

Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे दोन नेते शरद पवारांच्या संपर्कात, राजकीय समीकरणे बदलणार?