Pune Crime News | पुण्यातून अपहरण करुन तरुणांना शेतात नेऊन बांबुने मारहाण करुन तब्बल एक महिना ऊसतोडणी करुन घेण्याचा नवा बेठबिगारीचा प्रकार उघड

Pune Crime News | A new type of forced labour has been revealed in Pune, where young men are kidnapped, taken to the fields, beaten with bamboo and forced to cut sugarcane for a month.

पुणे : Pune Crime News | गावाकडे कामाला दिवसा १ हजार रुपये रोजावर काम देण्याचे आमिष दाखवून तरुणांना म्हाडा तालुक्यात नेऊन त्यांच्याकडून पहाटेपासून रात्री १० वाजेपर्यंत ऊसतोडणी करुन घेत होते. कामाला नकार दिला तर केबलच्या वायरने व बांबुने मारहाण करुन जरबदस्तीने काम करुन घेण्याचा नवा बेठबिगारीचा  प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्यातून पळून आलेल्या एका तरुणाने बंडगार्डन पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरुन हा सर्व प्रकार समोर आला आहे.

याबाबत अमित अशोक दळवी (वय ३३, रा. ए विंग स्काय वॉटर सोसायटी, वाघोली) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अप्पा तांबे, अक्षय तांबे, शुभम (रा. मु पो नाडी, ता. म्हाडा, जि. सोलापूर) यांच्यावर अपहरण व दुखापत आणि बेकायदेशीर सक्तीची मजुरी कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यामधील नाडी येथे २४ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. २३ डिसेंबर रोजी रात्री त्यांनी उशिरा अरोरा टॉवर येथे डिलिव्हरी दिली. त्यानंतर पुणे रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटरबाहेर ते झोपले होते. २४ डिसेंबर रोजी सकाळी उठले तेव्हा त्यांचा मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. ते दिवसभर स्टेशन परिसरात फिरत होते. रात्री एकाने अमित दळवी यांना काम पाहिजे का असे विचारले. त्यांनी होकार दिल्यावर पुण्याजवळ शेतात काम आहे. एक हजार रुपये रोजची मजुरी असे सांगितले. त्यानंतर त्यांना रात्री ११ वाजता पुणे स्टेशन येथून आणखी दोन तीन जणांना घेऊन एका कारमध्ये बसविले.

पहाटे ३ वाजता सोलापूर जिल्ह्यात एका ठिकाणी सोडले. तेथून एका मालवाहू गाडीतून त्यांना म्हाडा येथील अप्पा तांबे यांच्या घराजवळील एका खोलीत ठेवण्यात आले. त्यांच्याकडून ऊस तोडणीचे काम करुन घेण्यात आले. ऊसतोडणीचे काम अत्यंत कष्टाचे असल्याने अमित दळवी यांच्याकडून ते काम होत नव्हते. अप्पा तांबे हे त्यांना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कामासाठी उठवत होते. रात्री १० वाजेपर्यंत ऊस तोडणीचे काम त्यांच्या इच्छेविरुद्ध करुन घेत होते. काम करण्यास नकार दिला असता अप्पा तांबे, अक्षय तांबे व शुभम नावाची व्यक्ती त्यांना केबलच्या वायरने व बांबुने माहरण करुन जबरदस्तीने काम करण्यास लावत होते.

काम झाल्यावर खोलीत कोंडुन ठेवत होते. तसेच कामाचा मोबदला म्हणून एक रुपया दिला नाही. म्हणून २९ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता तो नजर चुकवून शेता शेतातून चालत मुख्य रस्त्यावर आला. तेथून कुर्डवाडी रेल्वे स्टेशनवर आला. एकाच्या मोबाईलवरुन वडिलांशी संपर्क साधला. रेल्वेने पुणे स्टेशनला आला. ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आता त्याने फिर्याद दिली आहे.

पुणे रेल्वे स्टेशनवरील एजंट हा अनोळखी आहे. त्याच्याबरोबर आणखी काही तरुणांकडून ऊसतोडणी करुन घेऊन त्यांना डांबुन ठेवले जात असल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.

You may have missed