Pune Crime News | पुणे रेल्वे स्टेशन येथील प्रिपेड रिक्षा स्टँडवरुन प्रवाशांना घेऊन जाणार्या रिक्षाचालकाला बेदम मारहाण (Video)
पुणे : Pune Crime News | पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway Station) येथील प्रिपेड रिक्षा स्टँडवरुन (Prepaid Rickshaw Stand) प्रवाशांना घेऊन जाणार्या रिक्षाचालकाने बाजीराव रोड (Bajirao Road Pune) येथे जाण्यासाठी कमी भाडे कोणी सांगितले असे विचारल्याने ८ ते ९ रिक्षाचालकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण (Marhan) करुन जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली.
https://www.instagram.com/p/DEFfiEFpBEE
याबाबत आसीफ याकुब शेख (वय ४३, रा. नाना पेठ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी फिरोज बाबुलाल शेख (रा. कोंढवा), नदीम व त्यांच्या ६ ते ७ रिक्षाचालक साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुणे रेल्वे स्टेशन येथील प्रिपेड रिक्षा बुथवर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आसीफ शेख हे रिक्षाचालक प्रिपेड बुथवर थांबले होते. त्यांना बाजीराव रोडवर जाणारा ग्राहक मिळाला, त्याला घेऊन ते निघत असताना प्रवाशांने विचारले की, बाकीचे रिक्षावाला ८० रुवये घेतात, तुम्ही १२० रुपये का घेता. त्यावर रिक्षाचालक शेख म्हणाले, तुम्हाला ८० रुपये म्हटलेल्या रिक्षा सोबत तुम्ही जाऊ शकता़, असे सांगत असताना तेथे शेजारीच एका रिक्षामध्ये बसलेल्या ३ रिक्षाचालक त्यांच्याजवळ आले.
त्यांच्या तोंड ओळखीचा रिक्षाचालक फिरोज शेख याने आमचे रिक्षावाल्यांचे नादी लागू नको नाहीतर चिरुन टाकीन असे
म्हणून शिवीगाळ करुन त्यांच्या चेहर्यावर, पोटात मारहाण करुन खाली पाडले. लाथा बुक्क्यांनी मारहाण करु लागले.
तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी सोनी शेंडगे या मध्ये पडले असता त्यांना बाजुला ढकलून दिल्याने त्या खाली पडल्या.
तेव्हा तेथे इतर ६ ते ७ रिक्षाचालक आले. त्यांनीही शिवीगाळ करुन फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते (API Arjun Mohite) तपास करीत आहेत. (Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत