Pune Crime News | पुण्यात शाळकरी मुलीला दारू पाजून बलात्कार; व्हिडिओ मोबाईलमध्ये काढल्याचा धक्कादायक प्रकार
मैत्रिणीनेचे फुस लावून नेले, अल्पवयीन मुले ताब्यात
पुणे : Pune Crime News | १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तिच्या मैत्रिणीने फुस लावून नेले. मुलांनी तिला जबरदस्तीने दारु पाजून तिच्यावर अत्याचार केला (Pune Rape Case). त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Samarth Police) दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत या मुलीच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी नाना पेठ (Nana Peth Pune) येथील पेट्रोल पंप, वानवडीतील हेवन पार्क, काळेपडळ येथील आरोपीच्या घरी घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांची १३ वर्षाची मुलगी असून तिच्या वयाच्याच एका मैत्रिणीच्या मित्राने जबरदस्तीने फिर्यादीच्या मुलीशी शरीरसंबंध केले. या मैत्रिणीने तिला फुस लावून रिक्षामध्ये दारु पाजून तिच्या मित्राच्या वानवडीतील घरी नेले. ती दारुच्या नशेत असताना एकाने तिच्याशी शारीरीक संबंध केले.
दुसर्याने त्याचा मोबाईलवर व्हिडिओ काढला.
या घटनेची माहिती मिळताच समर्थ पोलिसांनी चौघांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.
त्यातील दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद