Pune Crime News | गावाकडे केलेल्या विहिरीच्या खोदकामाच्या पैशावरुन तरुणाला मारहाण करुन पोटात चाकूने वार करुन केले गंभीर जखमी; वाघोली पोलिसांनी तिघांना केली अटक

Pune Crime News | A young man was beaten up and stabbed in the stomach over money for digging a well near his village; Wagholi police arrested three people

पुणे : Pune Crime News |  बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील निमगाव चौभा येथील शेतातील विहिरीचे खोदकाम केले़ त्याच्या मजुरीचे पैसे देण्यावरुन झालेल्या वादात चौघांनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याच्या पोटात चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. त्याचा मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

किरण रघुनाथ मुरकुटे (वय ४०, रा. निमगाव चौभा, ता. आष्टी, जि. बीड) हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची आई नंदाबाई रघुनाथ मुरकुटे (वय ७४) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दीपक अंबादास शिंदे Deepak Ambadas Shinde (वय ५१), प्रेम दीपक शिंदे Prem Deepak Shinde (वय २४), आकाश दीपक शिंदे Akash Deepak Shinde (वय २५, सर्व रा. वाडेबोल्हाई, ता. हवेली) यांना अटक केली आहे. राज शिंदे (वय २१) हा पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हा प्रकार वाघोली बाजारतळ समोर वाघोली आव्हाळवाडी रोडच्या बाजुला १६ जानेवारी रोजी दुपारी १ ते १७ जानेवारी सकाळी सव्वा अकरा वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील निमगाव चौभा येथील राहणारे आहेत. किरण मुरकुटे यांनी आरोपीकडून गावाकडे विहीर खोदकाम करुन घेतले. त्याच्या मजुरीचे पैसे दिल्याचे असल्याचे किरण मुरकुटे यांचे म्हणणे आहे. तर हे पैसे दिले नसल्याचे आरोपींचे म्हणणे आहेत. हे सर्व जण भांडी विकण्याचे काम करतात.

१६ जानेवारी रोजी या मजुरीचे पैशांवरुन आरोपींनी किरण मुरकुटे यांना हाताने मारहाण करुन त्यांचा १५ हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन घेतला होता. तो मोबाईल घेण्यासाठी फिर्यादी, त्यांचा मुलगा व इतर हे सर्व दुसर्‍या दिवशी वाघोली बाजारतळावर आले होते. यावेळी आरोपींनी किरण मुरकुटे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. राज शिंदे याने लोखंडी हत्यार किरण याच्या पोटात खुपसून त्याला गंभीर जखमी केले. वाघोली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शहादेव हवाले तपास करीत आहेत.

You may have missed