Pune Crime News | मित्राला न बोलविल्याने तरुणाचे अपहरण करुन केली मारहाण; पैशांच्या वादातून डेक्कन परिसरात भरदिवसा घडला प्रकार
पुणे : Deccan Pune Crime News | पैशांच्या व्यवहाराच्या कारणावरुन मित्राला न बोलावल्याने एका तरुणाचे अपहरण (Kidnapping Case) करुन त्याच्यावर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत सिद्धार्थ अशोक बचाटे (वय २३, रा. किरकटवाडी) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ज्योतिरादित्य गिते (वय ३६, रा. मोंजरी व त्याच्या ६ ते ७ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २३ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान डेक्कन पीएमटी बसस्टॉप ते वानवडीतील संविधान चौक दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र रवी वाघमारे याला आरोपी ज्योतिरा गिते याने पैसे दिले होते. तो पैसे वेळेवर परत करत नसल्याने गिते याने वाघमारे याला बोलविण्यास सांगितले होते. फिर्यादी याने रवी वाघमारे याला बोलावून घेतले नाही़ याचा राग मनात धरुन गिते व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांना मारहाण केली.
पांढर्या रंगाच्या कारमध्ये जबरदस्तीने बसवून वानवडीतील संविधान चौकात नेले.
तेथे कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात, पाठीवर, हातावर वार करुन गंभीर जखमी केले.
फिर्यादी यांनी उपचार केल्यानंतर डेक्कन पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील (PSI Ajitkumar Patil) तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी
Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता