Pune Crime News | तरुणीने आपल्या मैत्रिणीचा गळा पकडून चाकूने हातावर व गळ्याजवळ मारुन केले गंभीर जखमी; कारण ऐकून तुम्ही व्हाल हैराण

crime-logo

पुणे : Pune Crime News | त्या दोघी समवयस्क, एकमेकीच्या जीवस्य कंठस्थ मैत्रिणी, दोघीही जवळ जवळ राहतात. असे असताना एका तरुणीने आपल्या मैत्रिणीचा गळा पकडून तिच्या हातावर व गळ्याजवळ चाकूने वार करुन तिला गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. या घटनेत जखमी झालेल्या तरुणीकडून मारहाणीचे कारण ऐकून पोलीसही चक्रावून गेले.

शितल नावाच्या २९ वर्षाच्या तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिच्या अश्विनी नावाच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क येथील दरवडे मळा येथे १८ डिसेंबर रोजी साडेदहा वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघी दरवडे मळा येथे राहत असून दोघीही २९ वर्षाच्या आहेत. त्या नोकरी करतात. अश्विनी हिला लग्नाकरीता पाहण्यास पाहुणे येणार होते. तिला हे पसंत नव्हते. त्यामुळे तिने आपली मैत्रिण शितल हिला सांगितले की तु पाहायला येणार्‍या पाहुण्यांना येऊ नका, असे सांग. शितल हिने असे करण्यास नकार दिला. या गोष्टीचा अश्विनीच्या मनात राग होता. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता दोघी भेटल्या. या कारणावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा अश्विनीने हाताने मारहाण करुन शितलचा गळा पकडला. चाकूने तिच्या हातावर व गळ्याजवळ मारुन जखमी केले.  पोलीस हवालदार बढे तपास करीत आहेत.

You may have missed