Pune Crime News | बुधवार पेठेत पुन्हा 4 महिलांसह 5 बांगला देशीवर कारवाई ! महिलांना वेश्या व्यवसायाला लावणार्‍या पापा  भैय्यासह चार जणांवर गुन्हा दाखल, कुंटणखानाचालकास अटक

Pune Crime News | Action against 5 Bangladeshis including 4 women in Budhwar Peth again! Case registered against four people including Papa Bhaiya who forced women into prostitution, brothel operator arrested

पुणे : Pune Crime News | बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आणखी ४ महिला व एक पुरुष असे ५ बांगला देशी नागरिक रहात असल्याचे आढळून आले आहे. फरासखाना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. ब्युटीपार्लर, टेलरिंगचे काम देण्याच्या नावाखाली बांगला देशातून पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावणार्‍या पापा शेख याच्यासह ४ जणांवर पोलिसांनी अनैतिक वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

बांगला देशी एजंट मुल्ला, बाबु भैय्या ऊर्फ पापा शेख (रा. बुधवार पेठ), भोपसिंग राजपूत (वय २६, रा. जनता बिल्डिंग, बुधवार पेठ), घरमालकीण मीनाक्षी रमेश मेत्री (रा. बुधवार पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. कुंटणखाना चालक भोपसिंग राजपूत याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गंगाधर जावळगी यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगवर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा घातला. त्यात पहिल्या मजल्यावर मुळच्या बांगला देशातील चार महिला व एक पुरुष आढळून आले. भोपसिंग राजपूत हा कुंटणखाना चालवत होता. तो या महिलांकडून वेश्या व्यवसाय करवुन घेत होता. ग्राहकांकडून आलेले पैसे स्वत:कडे ठेवत होता. घरमालकीण मिनाक्षी मेत्री हिला तो काही पैसे देत होता.

या महिलांकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांना ब्युटी पार्लरमध्ये किंवा टेलरिंगचे कामात नोकरी देण्याचे आश्वासन देऊन बांगला  देशी एजंट मुल्ला याने पुण्यात आणून पापा शेख याच्या हवाली केले होते. त्याने जबरदस्तीने पैशाचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने त्यांना त्याचे ऐकण्याशिवाय पर्याय नसल्याने त्यांनी पोलिसांना सांगितले.

गेल्या महिन्यात शहर पोलिसांनी किमान दोन वेळा नाकाबंधी बुधवार पेठेत छापामारी केली होती. त्यावेळी जवळपास १२ बांगला देशी महिला आढळून आल्या होत्या.

पापा शेख हा बुधवार पेठेत आणल्या जाणार्‍या महिलांचा एजंट म्हणून काम करतो. गेल्या महिन्यातही त्याच्याविरुद्ध बांगला देशी महिलांना वेश्या व्यवसायाला लावण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे तपास करीत आहेत.

You may have missed