Pune Crime News | फास्टट्रॅक कंपनीच्या नावाने बनावट घड्याळांची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई; शनिवार पेठेतील दुकानावर छापा, 175 घड्याळे जप्त (Video)

Fasttrack

पुणे : Pune Crime News | फास्ट ट्रॅक कंपनीचे कॉपीराईट असलेल्या घड्याळाच्या नावाखाली बनावट घड्याळांची विक्री करणार्‍या दुकानावर पोलिसांनी छापा घातला. त्यात दुकानातील १ लाख ७५ हजार रुपयांची १७५ घड्याळे जप्त करण्यात आली आहे. (Pune Crime Branch)

https://www.instagram.com/reel/DFkaTB6JwfN/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

देवजीबाई प्रजापती (रा. उमाप्रसाद सोसायटी, शनिवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस हवालदार प्रताप गायकवाड, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, पोलीस अंमलदार उमाकांत स्वामी यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी शुक्रवार पेठेतील शहाबिया सोसायटीचे पार्किगमध्ये असलेल्या चामुंडा नॉव्हेल्टीज या दुकानावर छापा घातला. तेथे फास्टट्रॅक कंपनीचे मनगटी घड्याळ कॉपीराईट केलेले असताना बनावट घड्याळे फास्टट्रॅक कंपनीच्या नावाने विकले जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हे १७५ घड्याळे जप्त करुन फरासखाना पोलीस ठाण्यात कॉपीराईट कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे वक्तव्य, म्हणाले…

Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा

You may have missed