Pune Crime News | महापालिका निवडणुक काळात मध्यवर्ती शहरात अडीशे गुन्हेगारांवर कारवाई

Pune Crime News | Action taken against 200 criminals in central city during municipal elections

पुणे : Pune Crime News | महापालिका निवडणुक शांततेत आणि सुरक्षितेत पार पडावी, यासाठी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी या काळात तब्बल २५६ गुन्हेगारांवर विविध प्रकारची कारवाई केली.

परिमंडळ एकच्या हद्दीत खडक, फरासखाना, समर्थ, विश्रामबाग, शिवाजीनगर, डेक्कन ही पोलीस ठाणी येतात. निवडणुक प्रचारावर प्रभाव टाकू नये, यासाठी ८९ गुन्हेगारांना परिमंडळ एकच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले. १६४ जणांकडून कोणताही गुन्हा करणार नाही, अशा प्रकारचा बाँड लिहून घेण्यात आला. २१ जणांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. बेकायदा दारु विक्री करणार्‍या दोघांची कारागृहात रवानगी करण्यात आली. एका गुन्हेगाराला एमपीडीएअंतर्गत १ वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

मतदान करताना मतदारांवर कोणीही दडपण आणू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी परिमंडळ एकच्या हद्दीत १२ ठिकाणी पोलिसांनी रुट मार्च काढला होता.