Pune Crime News | वारज्यातील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले नागपूर कारागृहात स्थानबद्ध
पुणे : Pune Crime News | वारजे माळवाडी येथील सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली असून त्याला १ वर्ष नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.
सिद्धार्थ सोमनाथ गवळी Siddharth Somnath Gawli (रा. वारजे माळवाडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
सिद्धार्थ गवळी याने वारंवार गुन्हे करुन शांतता व सुव्यवस्था गालबोट लावण्यास कारणीभूत ठरत होता. त्याला वेळीच अटकाव करणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज साळुंखे, पोलीस अंमलदार विजय खिलारी, किरण तळेकर यांनी प्रस्ताव तयार करुन त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पाठविला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी २७ मार्च रोजी एमपीडीए अन्वये त्याला नागपूर कारागृहात ठेवण्याचा आदेश दिला. हा आदेश प्राप्त होताच वारजे पोलिसांनी सिद्धार्थ गवळी याला ताब्यात घेऊन त्याची नागपूर कारागृहात रवानगी केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोलकोटगी, पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, मनोज साळुंखे, पोलीस अंमलदार विजय खिलारी, बालाजी काटे, किरण तळेकर, निखील तांगडे, योगेश वाघ यांनी केली आहे.
