Pune Crime News | डोक्याच्या जखमेवर मलमपट्टी केल्यानंतर पैशावरुन मद्यपीने क्लिनिकमध्ये केली तोडफोड, डॉक्टरांना मारहाण, काच लागून क्लिनिकमधील रुग्ण जखमी

Pune Crime News | After bandaging a head wound, an alcoholic vandalized a clinic for money, beat up a doctor, injured a patient in the clinic due to glass

पुणे : Pune Crime News | मद्यपीच्या डोक्याला लागलेल्या जखमेवर डॉक्टरांनी मलमपट्टी केली. त्याच्या पैशांवरुन वाद घालून मद्यपीने डॉक्टरांना शिवीगाळ करुन क्लिनिकमध्ये तोडफोड केली. यावेळी काच लागून क्लिनिकमधील रुग्ण जखमी झाला. लोणी काळभोर पोलिसांनी या मद्यपीवर गुन्हा दाखल केला आहे.

संतोष रमेश गुंजाळ Santosh Ramesh Gunjal (वय ३५, रा. काकडे वस्ती, थेऊर, पुणे-सोलापूर रस्ता) असे गुन्हा दाखल झालेल्या मद्यपीचे नाव आहे. याबाबत डॉ. संतोष महादेव गायकवाड (वय ३७, रा. कुशल वाटीका, लोणी काळभोर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना थेऊर येथील श्रेया क्लिनिकमध्ये १८ मार्च रोजी दुपारी पाऊण वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. गायकवाड हे पेशंट तपासत असताना संतोष गुंजाळ हा दारु पिऊन अचानक क्लिनिकच्या तपासणी कक्षात आला. त्याच्या डोक्याला लागले होते. त्या जखमेवर डॉक्टरांनी मलमपट्टी करुन प्रथमोपचार केले. त्याचे २२० रुपये डॉक्टरांनी त्याच्याकडे मागितले. तेव्हा संतोष गुंजाळ याने पैसे देण्यास नकार देऊन डॉक्टरांना वाईट शिवीगाळ केली. क्लिनिकमध्ये गोंधळ घातला. दगड फेकून मारुन क्लिनिकचा काचेचा दरवाजा व पार्टिशनचे फोडून नुकसान केले. संतोष गुंजाळ याने डॉक्टरांच्या पाठीच्या डाव्या बाजूस व खालच्या बरगड्या जवळ, डाव्या हाताच्या पंजावर दगड मारल्याने मुक्का मार लागून जखम झाली. तसेच त्याने दगड फेकून क्लिनिकचा काचेचा दरवाजा तोडला. या दरवाजाची काच उडून रुग्ण हनुमंत बळे यांना लागून त्यांच्या उजव्या हाताचे मनगटाला लागून जखम झाली. सहायक पोलीस निरीक्षक अरुण जाधव तपास करीत आहेत.

You may have missed