Pune Crime News | दारु पिऊन मारहाण करणार्या मुलाचा गळा आवळून डोके जमिनीवरील फरशीवर आपटून केला खुन;फुरसुंगी पोलिसांनी वडिलांना केली अटक

पुणे : Pune Crime News | दारु पिऊन घरी आलेल्या मुलाने आई वडिलांना मारहाण केल्याने चिडलेल्या वडिलांना मुलाचा गळा गमजाने आवळला. त्याचे डोके फरशीवर आपटून खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Murder Case)
प्रशांत सुरेश जमदाडे (वय ३५, रा. कैलासनगर, वलवा वस्ती, वडकी, ता. हवेली) असे खुन झालेल्याचे नाव आहे. फुरसुंगी पोलिसांनी सुरेश बाबुराव जमदांडे (वय ५९, रा. वडकी) यांना अटक केली आहे.
याबाबत मनोहर ताबाजी डोके (वय ३६, रा. गजानन नगर, फुरसुंगी) यांनी फुरसुंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना वडकीमधील कैलासनगर येथील घरी रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोहर डोके यांचे सुरेश जमदांडे हे सासरे आहेत. तर प्रशांत जमदांडे हा मेव्हणा आहे. प्रशात हा दारु पिऊन घरी आला. त्याने आपल्या आई वडिलांना शिवीगाळ केली. वडिलांसोबत झटापटी करुन भांडण करु लागला. तेव्हा रागाच्या भरात सुरेश यांनी प्रशांत याला जमिनीवर खाली पाडून कापडी गमजाने त्याचा गळा आवळला. प्रशांत याचे डोके जमिनीवरील फरशीवर आपटून त्याचा खुन केला. ही घटना समजताच पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) राजेश खांडे, संजय पतंगे, सुदर्शन गायकवाड व अन्य पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले़ त्यांनी वडिलांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करीत आहेत.