Pune Crime News | पुण्यात मराठी तरुणांना त्रास देणाऱ्या एअरटेल मॅनेजरला मनसेकडून चोप, मराठीत बोललात तर नोकरीवरून काढून टाकण्याची दिली होती धमकी (Video)
पुणे : Pune Crime News | मुंबई आणि ठाणे येथे परप्रांतियांनी मराठी माणसाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना आता पुण्यातील मराठी-हिंदी वाद समोर आला आहे. ऑफिसमध्ये मराठीमध्ये बोललात तर नोकरीवरून काढून टाकेन, अशी धमकी एअरटेलच्या मॅनेजरने (Airtel Manager) मराठी कर्मचाऱ्यांना दिली आहे. त्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी या मॅनेजरला चांगलाच चोप दिला आहे.
https://www.instagram.com/p/DEXkWadJq5b
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाकडेवाडी येथील एअरटेल ऑफिसमध्ये हा प्रकार घडला आहे. येथील मॅनेजरने तीन महिन्यांपासून येथील कामगारांना पगार दिलेला नव्हता. याशिवाय या कामगारांना सणांची सुट्टीही दिली जात नव्हती. इतकेच नाही तर कोणतीही सेना किंवा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना घेऊन या, मी मराठी बोलणार नाही. जर इथे कुणी मराठीत बोललं तर नोकरीवरून काढून टाकीन, अशी धमकीच मॅनेजरने दिली होती.
मॅनेजरच्या या त्रासाला कंटाळून तरुणांनी याची तक्रार मनसेच्या कार्यकर्त्यांना केली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी एअरटेल ऑफिसमध्ये घुसून या मॅनेजरला चांगलाच चोप दिला. मराठी तरुणांना त्रास दिला तर एकाचवेळी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील एअरटेलची कार्यालये फोडू, असा इशाराच मनसे कार्यकर्त्यांनी दिला. या इशाऱ्यानंतर मराठी तरुणांचे पगार करण्यात आले आहेत. तसेच झालेल्या घटनेबाबत मॅनेजरने माफीही मागितली आहे. (Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक;
बीडच्या विशेष तपास पथकाला यश, पुण्यातून घेतले ताब्यात