
पुणे : Pune Crime News | आखाड पार्टीत चेष्टा मस्करी केल्याने झालेल्या वादात दहा जणांनी मंडळातील एकाला बेदम मारहाण करण्यात आली. भांडण सोडविण्यासाठी आईला ढकलून दिल्याने तिचा हात फॅक्चर झाला.
याबाबत शंकर सुरेश राठोड (वय ३५, रा. सूर्यविकास मंडळासमोर, महात्मा फुले पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अजय साका (रा़. बिबवेवाडी) मोहन पुजारी, अनंत धर्मकांबळे, परशुराम पुजारी, महेश पुजारी, नरसिंह पुजारी, करण पुजारी, अशोक धनगर, सौरभ राजहंस, नरेश धर्मकांबळे (सर्व रा. सूर्यविकास मंडळाशेजारी, महात्मा फुले पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गंज पेठेतील सूर्यविकास मंडळाच्या मागे रविवारी रात्री ११ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर राठोड हे महेश पुजारी यांच्या घरी रविवारी रात्री आखाड पार्टी करत होते. त्यावेळी दोघांनी दारु पिली होती. दारु पित असताना सूर्यविकास मंडळाचा अध्यक्ष अजय साका यांनी शंकर राठोड यांना किरकोळ कारणावरुन चिडवले. तेव्हा साका याच्या डोक्यात शंकर यांनी टपली मारली. दारुचा अंमल त्यांच्यावर झाला असल्याने याचा राग मनात धरुन सर्वांनी फिर्यादी शंकर व त्यांचा भाऊ सागर राठोड यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. फिर्यादी यांची आई भांडण सोडवण्यास आली असता तिला मोहन पुजारी याने ढकलून दिल्याने त्या पडल्या. त्यांचा उजवा हात फॅक्चर झाला. पोलीस हवालदार वणवे तपास करीत आहेत.