Pune Crime News | वालचंदनगरमधील सराईत गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी पकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे केली जप्त
पुणे : Pune Crime News | वालचंदनगर परिसरात ९ गुन्हे असलेला व सध्या नऱ्हे येथे राहणार्या सराईत गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी पकडून त्याच्याकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
सुयश सोमनाथ घोडके Suyash Somnath Ghodke (वय २४, रा. सिद्धी हाईटस, अभिनव कॉलेज जवळ, नर्हे) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
सुयश ऊर्फ तात्या घोडके याच्यावर नातेपुते, सातारा शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, वालचंदनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने माराहण करणे, अवैध वाळू चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे असे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. वालचंदनगर परिसरात दहशत निर्माण केल्याने त्याला जिल्हाधिकार्यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध केले होते. तो फरार झाला होता. घराला बाहेरुन कुलूप लावून आतमध्ये राहत असल्याची माहिती मिळाल्यावर वालचंदनगर पोलिसांनी त्याला पकडले होते. सुयश घोडके याच्याकडून ९ सुतळी बॉम्ब, ३ पिस्टल आणि तलवारी व कोयते जप्त केले होते.
सुयश घोडके हा सध्या नर्हे येथे रहात आहे. आंबेगाव पोलीस ठाण्यातील अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते व प्रमोद भोसले यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, स्वामी नारायण मंदिराजवळील सर्व्हिस रोडवर एक जण थांबला असून त्याच्याकडे शस्त्र आहेत. या बातमीची खात्री करुन पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व त्यांच्या पथकाने सुयश घोडके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४१ हजार रुपयांचे गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते,सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमळकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, ज्ञानेश्वर चित्ते, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, राकेश टेकवडे, हरिश गायकवाड, सचिन गाडे, धनाजी धोत्रे यांनी केली आहे.
