Pune Crime News | लोणी काळभोर, हडपसर परिसरात भाईगिरी करणार्‍या सराईत टोळीप्रमुखासह दोघांना पकडून खंडणी विरोधी पथकाने 2 पिस्टल व 1 जिवंत काडतुस केले जप्त

Pune Crime News | Anti-Extortion Squad arrests two people including criminal gang leader involved in Bhaigiri in Loni Kalbhor, Hadapsar area, seizes 2 pistols and 1 live cartridge

पुणे : Pune Crime News |  लोणी काळभोर, हडपसर परिसरात भाईगिरी करणार्‍या सराईत टोळीप्रमुखासह दोघांना खंडणी विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून २ पिस्टल व एक जिवंत  काडतुस जप्त केले आहे.

शुभम कैलास कामठे Shubham Kailash Kamthe (वय ३०, रा. कदम वाक वस्ती, लोणी काळभोर) आणि त्याचा साथीदार शुभम श्रीमंत रसाळ Shubham Rich Rasal (वय १९, रा. पावर हाऊस शेजारी, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शुभम कामठे हा सराईत गुन्हेगार असून लोणी काळभोर, हडपसर परिसरात आपल्या टोळीची दहशत माजवून आहे. त्याच्यावर विरुद्ध विविध प्रकारचे ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या टोळीविरुद्ध २०२१ मध्ये मोक्का कारवाई करण्यात आली होती. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात तो गेल्या ७ महिन्यांपासून फरार होता.

खंडणी विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या देखरेखी खाली पथक १८ डिसेंबर रोजी दुपारी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार आझाद पाटील व पवन भोसले यांना माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार शुभम कामठे हा रॉयल स्टे ईन हॉटेल समोर कोणाची तरी वाट पहात असून त्याच्याकडे पिस्टल आहे. या माहितीनुसार पोलीस पथक तेथे गेले. पोलिसांना पाहून दोघे जण पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी दोघांना पकडले. शुभम कामठे याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्टल व पॅन्टच्या खिशात १ जिवंत काडतुस आढळून आले. त्याच्याबरोबर असलेल्या शुभम रसाळ याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल सापडले. फुरसुंगी पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टखाली दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार अजिनाथ येडे, दिलीप गोरे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, किरण पड्याळ, अमोल राऊत, आझाद पाटील, पवन भोसले, गणेश खरात, प्रशांत शिंदे यांनी केली आहे.

You may have missed