Pune Crime News | खंडणी विरोधी पथकाने सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल व काडतुसे केली जप्त; रात्रभर सापळा रचून केली अटक

Pune Crime News | Anti-Extortion Squad seizes village pistol and cartridges from innkeeper; Arrested after laying a trap overnight

पुणे : Pune Crime News । खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी रात्रभर सापळा रचून सराईत गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुस जप्त केले आहे.

संकेत गोरख चोरघे Sanket Gorakh Choraghe (वय २३, रा़. साई सिद्धी अपार्टमेंट, आंबेगाव पठार, मुळ रा. कोलवडी, ता. वेल्हा) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. संकेत चोरघे हा सराईत गुन्हेगार असून त्याला पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने २०२४ मध्ये पिस्टलसह अटक केली होती. राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तो आरोपी आहे.

खंडणी विरोधी पथक पाहिजे आरोपी, तडीपार गुन्हेगार चेक करत असताना पोलीस हवालदार सचिन माळवे व पोलीस अंमलदार दयानंद तेलंगे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार संकेत चोरघे याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. खंडणी विरोधी पथकाने संकेत चोरघे बद्दल माहिती घेतली असता तो आंबेगाव पठार येथील साईसिद्धी अपार्टमेंट मध्ये राहत असून त्याचे आंबेगाव पठार, तुकाई दर्शन व सिंहगड कॉलेज परिसरात येणे जाणे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी खंडणी विरोधी पथकाला संकेत चोरघे हा सिंहगड कॉलेज कॅम्पस येथे आला असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथक तेथे गेले असता संकेत चोरघे हा दुचाकीवरुन पळून गेला.

त्यानंतर खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तो रहात असलेल्या आंबेगाव पठार येथे रात्रभर सापळा रचला. २५ फेब्रुवारी रोजी तो घरी आला असता त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे ३५ हजार २०० रुपयांचे एक गावठी पिस्टल व त्याच्या मॅगेजिनमध्ये १ जिवंत काडतुस मिळून आले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अधिक तपासासाठी त्याला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार सचिन माळवे, दयानंद तेलंगे, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, नितीन कांबळे, गितांजली जांभुळकर, रहिम शेख व अमोल आवाड यांनी केली आहे़.

You may have missed