Pune Crime News | नोकरीच्या अमिषाने फसवणूक करणारा जवान ताब्यात; लष्करी गुप्तचर यंत्रणेची कारवाई
पुणे : Pune Crime News | लष्करात नोकरीच्या आमिषाने (Lure Of Job In Amry) तरुणाची फसवणूक (Cheating Fraud Case) करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जवानाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी (Bund Garden Police Station) गुन्हा दाखल केला आहे. लष्करी गुप्तचर यंत्रणेकडून (Military Intelligence) ही कारवाई करण्यात आली. शत्रुघ्न तिवारी Shatrughan Tiwari (वय २६, रा. गणेश कृपा चाळ, कल्याण, जि. ठाणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
तक्रारदार तरुण सिंहगड परिसरात राहायला आहे. आरोपी तिवारीने लष्करात भरतीची संधी अशी जाहिरात समाजमाध्यमांवर प्रसारित केली होती. जाहिरात वाचल्यानंतर तक्रारदार तरुण तिवारीच्या संपर्कात आला. तिवारीने लष्कर भरतीचे अमिष दाखवून तरुणाकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तरुणाला ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) परिसरात बोलवले. तक्रारदार तरुणाला संशय आल्याने त्याने पैसे दिले नाही. (Pune Crime News)
तिवारी लष्करात जवान आहे. लष्करी सेवा अर्धवट सोडून तो पसार झाला होता. त्याने लष्करात नोकरीची संधी अशी जाहिरात समाजमाध्यमात प्रसारित केली होती. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता.
तिवारीने फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून,
बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार (PSI Swapnil Lohar) तपास करत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक
Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद