Pune Crime News | झोपलेल्या 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणार्यास अटक
पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | महापालिकेसमोरील (PMC Metro Station) मेट्रो रेल्वे पुलाखाली आईबरोबर झोपलेल्या १० वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police Station) या नराधमाला अटक केली आहे.
अनिलकुमार उपाराम राठोड Anilkumar Uparam Rathod (वय २०, रा. काळेवाडी फाटा, कैलासनगर, थेरगाव) असे या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी पहाटे साडेचार वाजता घडली. (Molestation Case)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आपल्या १० वर्षाच्या मुलीसोबत महापालिका ऑफिससमोर मेट्रो रेल्वे पुलाखाली झोपल्या होत्या. पहाटेच्या वेळी आरोपी तेथे आला. झोपलेल्या मुलीशेजारी झोपून त्याने तिचा विनयभंग केला. हा प्रकार लक्षात आल्यावर तेथील लोकांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु