Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न
पुणे : Pune Crime News | मुलगी आठ दिवसांपासून ताप, सर्दी, खोकल्याने आजारी आहे. तिला हॉस्पिटलमध्ये नेले नाही. घरातील सिलेंडर संपून सहा दिवस झाले. तुम्हाला दारु पिण्यास पैसे आहेत, असे बोलल्याने दारुड्या नवर्याने पत्नीचे डोके दोन – तीन वेळा भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Kill)
याप्रकरणी सायली मयुर कळंबेकर (वय २८, रा. दत्तनगर, आंबेगाव) या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मयुर सुरेंद्र कळंबेकर (वय ३६, रा. दत्तनगर, आंबेगाव) याला अटक केली आहे. ही दत्तनगरमध्ये शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी यांना तीन मुली आहे. त्यांचा पती मयुर हा बिगारी काम करतो. त्याला दारुचे व्यसन असून तो नेहमी दारु पिऊन फिर्यादीला विनाकारण त्रास देत असतो. २३ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे मयुर कामावरुन दारु पिऊन रात्री साडेनऊ वाजता घरी आला. त्यांची मुलगी सांभवी गेल्या ८ दिवसांपासून ताप, सर्दी, खोकल्याने आजारी आहे. पण, पैसे नसल्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेता आले नाही. मुलीला हॉस्पिटलमध्ये नेण्यास पैसे नाहीत, व तुम्हाला दारु प्यायला पैसे आहेत, अशी विचारणा फिर्यादी यांनी केली. त्यावर मयुर याने तिच्याशी वाद घातला.
त्यानंतर त्याने फिर्यादी यांना सिलेंडर कोणी दिला असे विचारले. त्यावर फिर्यादी यांनी गेली सहा दिवसांपासून घरातील सिलेंडर संपलेला आहे. तुम्ही आणला नाही. त्यामुळे माझ्या आईने दिला आहे, असे सांगितले असता त्याचा राग आला व त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. फिर्यादी यांचे डोके भिंतीवर दोन तीन वेळा आपटून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी पतीला अटक केली असून भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा