Pune Crime News | गरवारे मेट्रो स्टेशनवर तरुणीची छेडछाड करण्याचा प्रयत्न, डेक्कन पोलिसांनी रोड रोमिओवर केला गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | तरुणीचा पाठलाग करुन तिला तुम्ही खूप आवडता, असे बोलून लज्जास्पद कृती करण्याचा प्रकार गरवारे मेट्रो स्टेशन येथे समोर आला आहे. डेक्कन पोलिसांनी या रोड रोमिओवर गुन्हा दाखल केला आहे.
ओंकार शिवाजी ओळसे Omkar Shivaji Olse (वय २६, रा. पिझा ऑफीस, चांदणी चौक) असे या रोड रोमिओचे नाव आहे. हा प्रकार गरवारे मेट्रो स्टेशन येथील मेट्रो ऑफिसजवळ २५ व २६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुणी मेट्रोने गरवारे मेट्रो स्टेशनवर आली. तेथून ती बाहेर येत असताना ओंकार ओळसे हा पाठलाग करत आला. तिला म्हणाला, मी आता तुमच्याकडे बघायचे पण नाही का?. मला तुमच्या सोबत बोलायचे आहे. तुम्ही खाली पार्किंगमध्ये आल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो. मला तुम्ही खुप आवडता, असे म्हणून त्याने स्त्री मनास लज्जा निर्माण होईल, अशी कृती केली. या तरुणीने आरडाओरडा केल्यावर पोलिसांनी त्याला पकडले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, संदीप कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला नोटीस दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पवार अधिक तपास करीत आहेत.
