Pune Crime News | प्रेमसंबंधावरुन तरुणाला झाडाला टांगून तीक्ष्ण हत्याराने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; मुंढवा पोलिसांनी चौघांना केली अटक

Pune Crime News | Attempted to kill a young man by hanging him from a tree and stabbing him with a sharp weapon over a love affair; Mundhwa police arrest four

पुणे : Pune Crime News | प्रेमसंबंधावरुन झालेल्या वादात चौघांनी तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला मुंढवा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

प्रविण धनंजय माने (वय ३५, रा. श्रीमाननगर, शेवाळेवाडी फाटा, मांजरी) यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. प्रविण माने हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या डोक्याला ४ टाके पडले असून पायावर खोलवर जखम झाली आह.

महेश सोमनाथ सरोदे Mahesh Somnath Sarode (वय ३५) त्याचे साथीदार आदित्य शरद भोसले Aditya Sharad Bhosale (वय २२), आदित्य संजय रोकडे Aditya Sanjay Rokde (वय २१), कैलास ओव्हाळ (वय २६, सर्व रा. भिमनगर, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मुंढवा येथील भिमनगरमधील बारामती अ‍ॅग्रो चिकन सेंटरसमोर १९ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता घडली.

मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मीता वासनिक यांनी सांगितले की, प्रविण माने आणि महेश सरोदे हे दोघेही ड्रायव्हर म्हणून काम करतात. प्रविण माने यांचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध आहेत. त्यावरुन महेश सरोदे याने मनात राग धरुन प्रविण माने याला फोन करुन भिमनगर येथे बोलावून घेतले. प्रविण माने हा तेथे आल्यावर महेश सरोदे व त्याच्या साथीदारांनी त्यांच्या डोक्यात, उजव्या गुडघ्यावर, दोन्ही हातावर, पाठीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. प्रविण माने यांना झाडाला टांगून मारहाण केली. तू पोलिसांकडे तक्रार दिली तर तुझी गेम वाजवू अशी धमकी देऊन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मीता वासनिक, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी घटनास्थळाला भेट दिली. मुंढवा पोलिसांनी प्रथम महेश सरोदे याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून त्याच्या इतर तिघा साथीदारांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले तपास करीत आहेत.

You may have missed