Pune Crime News | बाबुराव चांदरे यांच्यासह चौघांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन दिली धमकी दिल्याचा आरोप; जयेश मुरकुटे यांच्या तक्रारीनंतर अदखलपात्र गुन्हा दाखल

Pune Crime News | Baburao Chandare and four others allegedly abused, pushed and threatened him; A non-cognizable case was registered after Jayesh Murkute's complaint

पुणे : Pune Crime News | रस्ता आणि पाईप लाईनचे काम कायदेशीर परवानगी घेऊन करावे, असे सांगितल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाबुराव चांदेरे व इतरांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष जयेश संजय मुरकुटे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बाबुराव चांदरे, समीर चांदेरे, सिद्ध कलशेट्टी व एका अनोळखी व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार  बाणेरमधील पॅन कार्ड क्लब रोडवर ६ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडला होता.

महापालिका निवडणुका जवळ आल्याने लोकांची कामे करुन देण्यासाठी सर्वच नेते, माजी नगरसेवकांची धावपळ सुरु झाली आहे. पॅन कार्ड क्लब रोडवरील मुरकुटे यांच्या मालकीच्या मिळकतीमध्ये पूर्ण रस्ता व पाईन लाईनचे काम बाबुराव चांदेरे यांनी सुरु केले होते. त्याला मुरकुटे यांनी आक्षेप घेऊन हे काम कायदेशीर परवानगी घेऊन करावे, असे बोलले. त्याचा राग येऊन बाबुराव चांदेरे व समीर चांदेरे, सिद्ध कलशेट्टी व एकाने त्यांना शिवीगाळ करुन अपशब्द वापरुन, धक्काबुक्की केली़ तसेच धमकी दिली. अमोल जाधव यांना शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

You may have missed