Pune Crime News | अश्लिल फोटो काढून अपहरण करुन तरुणीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाला भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  जबरस्तीने मोबाईल हिसकावुन धमकी देऊन तिचे अपहरण करुन आकुर्डीला आपल्या रुमवर नेले. तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करुन तिचे अश्लिल फोटो काढून तुझ्या आई, वडिल, भावाला मारुन टाकण्याची नराधमाने धमकी दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.

प्रदिप पांडुरंग सुळे Pradeep Pandurang Sule (वय २५, रा. खंडोबा मंदिराजवळ, दत्तवाडी, आकुर्डी) असे या नराधमाचे नाव आहे. याबाबत एका २२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३ मार्च २०२६ रोजी घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही गेली २ वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. फिर्यादी या महाविद्यालयीन शिक्षण घेत असून आरोपी प्रदिप सुळे हा ओला टॅक्सीवर चालक म्हणून नोकरी करतो. त्यांच्या रिलेशनशीपबाबत तिच्या घरांना समजल्यावर त्यांनी याला विरोध केला. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याच्याशी संबंध तोडले होते. त्यातूनच ३ मार्च २०२६ रोजी प्रदिप सुळे फिर्यादीला भेटला. तिचा मोबाईल हिसकावुन घेतला. तिला जबरदस्तीने दुचाकीवरुन आपल्या आकुर्डी येथील रुमवर नेले. तिच्या पाठीवर, डोक्यावर व छातीवर जोरात लाथ मारली. त्यामुळे ती अर्धवट बेशुद्ध झाली. तिच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तिचे त्या अवस्थेत फोटो काढले. त्यानंतर तिला त्याने परत आणून सोडले. त्यानंतर तिला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करुन तुझे त्यावेळी काढलेले फोटो व्हायरल करुन तुझी बदनामी करतो. तुझे आई, वडिल, भावाला मारुन टाकतो, अशी धमकी दिली. या धमकीमुळे ही तरुणी घाबरुन गेली होती. शेवटी तिने धीर धरुन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक निकम तपास करीत आहेत.

You may have missed