Pune Crime News | गांजा विकणाऱ्या दोघांना भोसरी पोलिसांकडून अटक, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Arrest

पिंपरी : Bhosari Pune Crime News | विक्री करण्यासाठी गांजा बाळगणाऱ्या (Arrest In Ganja Case) एका आरोपीला अटक करुन त्याच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून गांजाचा मोठा साठा भोसरी पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक करुन दहा लाख 20 हजार रुपये किमतीचा 10 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.2) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दापोडी येथील रेल्वे पटरी (Dapodi Railway Station) लगत व हातगावकर चाळीत करण्यात आली.

सचिन यादव अडागळे (वय-35 रा. बापु कुटे चाळ, जयभिमनगर, दापोडी), सोहेल बबलू कुरेशी (वय-22 रा.रौंदळे चाळ, सीएमई गेट समोर, दापोडी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर फिरोज उर्फ बा दिलावर शेख याच्यावर एनडी.पीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई प्रभाकर हनुमंत खाडे (वय-39) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Bhosari Police Station)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी तपास पथकाला माहिती मिळाली की दापोडी येथील रेल्वे पटरी लगत असलेल्या सिद्धार्थ नगर येथे सचिन अडागळे गांजा विक्री करत आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी सचिन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली घेऊन 9 हजार 500 रुपये किमतीचा 90 ग्रॅम गांजा जप्त केला.
हा गांजा फिरोज आणि सोहेल यांच्याकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती आरोपीने दिली.
आरोपी फिरोज आणि सोहेल यांनी हातगावकर चाळीतील एका खोलीत गांजाचा साठा केल्याची माहिती तपास पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून खोलीतून 10 लाख 20 हजार रुपये किमतीचा 10 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त केला.
आरोपींनी विक्री करण्यासाठी गांजाचा साठा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले करीत आहेत. (Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या

Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर

Supriya Sule On Ajit Pawar Video | अजित पवारांच्या व्हिडिओवर सुप्रिया सुळेंकडून प्रत्युत्तर; म्हणाल्या, “अजित पवारांच्या आरोपांवर…”

You may have missed