Pune Crime News | गाडी बाजूला करण्यास सांगितल्याने 3 जर्मन  शेफर्ड  कुत्री अंगावर सोडल्याने मुलाला कुत्रे चावून झाली मोठी जखम; मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल

Pune Crime News | Boy suffers serious injuries after being bitten by 3 German Shepherd dogs after being asked to pull over; Case registered against dog owner who threatened to kill him by beating him

पुणे : Pune Crime News | विटांचा ट्रक आल्याने गाडी बाजूला करण्यास सांगितल्याच्या रागातून ३ जर्मन शेफर्ड कुत्री अंगावर सोडली. त्यातील एक कुत्रा मुलाच्या पायाला चावून रक्तस्त्राव झाला. वर कुत्र्याच्या मालकाने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

यामध्ये रोहन राजेंद्र जांभुळकर (वय ३९) हे जखमी झाले आहेत. याबाबत राजेंद्र एकनाथ जांभुळकर (वय ६५, रा. कॅमेलिया अपार्टमेंट, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कुत्र्याचा मालक जॉन गेगरी फर्नाडिस John Gregory Fernandes (वय ५७, रा. कपिल वुड्रो इस्टेट, आझादनगर, वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आझादनगरमधील सार्वजनिक रोडवर २९ मार्च रोजी दुपारी २ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभुळकर यांची आझादनगरमध्ये तीन गुंठे वडिलोपार्जित जमीन आहे. या जागेत त्यांनी बांधकाम सुरु केले आहे. बांधकामाकरीता विटांचा ट्रक आला. विटा खाली करायच्या होत्या. जांभुळकर यांच्या जागेच्या गेटसमोर जॉन फर्नाडिस याने त्याच्या मालकीची मारुती सेलेरो ही चार चाकी व दुचाकी पार्क केली होती. त्यामुळे विटांचा ट्रक आत नेता येत नव्हता. तेव्हा जांभुळकर यांनी गेटसमोर पार्क केलेली वाहने काढून घेण्याची विनंती केली. तेव्हा त्याने ही वाहने काढून घेण्यास नकार दिला. मुद्दाम भांडणे करण्यास सुरुवात केली. जांभुळकर व त्यांचा मुलगा रोहन यांनी फर्नाडिस याच्याशी वाद न घालता ही वाहने बाजूला सरकावण्याचा प्रयत्न करु लागले. तेव्हा जॉन फर्नाडिस याने त्याची ३ पाळीव जर्मन शेफर्ड कुत्री त्यांच्या अंगावर सोडली. त्यापैकी एका कुत्र्याने रोहन यांच्या डाव्या पायाच्या पोटरीचा जोराचा चावा घेतला. त्यांच्या पायाला मोठी जखम होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर जॉन फर्नाडिस याने हातील वस्तूने दोघा बापलेकांच्या अंगावर धावून त्यांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस हवालदार क्षीरसागर तपास करीत आहेत.

You may have missed