Pune Crime News | वडिलांनी बक्षीसपत्र करुन जमीन दिल्याच्या रागातून सख्खा भाऊ, पुतण्याला हाताने व दगडाने मारहाण करुन केले जखमी

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | वडिलांनी बक्षीसपत्र करुन जमीन एका मुलाच्या  व मोठ्या बहिणीच्या नावावर करुन दिल्याच्या रागातून मोठ्या भावाने लहान भाऊ व पुतण्याला हाताने व दगडाने मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत गोरक्ष रंगराव जवळकर (वय ५२, रा. बिवरी, पो. नायगाव, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राजेश रंगराव जवळकर Rajesh Rangrao Javalkar (वय ५५), रेखा राजेश जवळकर Rekha Rajesh Javalkar (वय ५०) आणि अभिषेक राजेश जवळकर Abhishek Rajesh Javalkar (वय २१, सर्व रा. बिवरी, पो. नायगाव, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना फिर्यादीच्या घरासमोर ३० मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून जवळ राहतात. फिर्यादी यांच्या वडिलांनी त्यांच्या नावावरील जमीन मुलाच्या व मोठ्या बहिणीच्या नावावर बक्षिसपत्र करुन दिली आहे. त्यामुळे फिर्यादी यांचा मोठा भाऊ राजेश जवळकर यांना राग आला. हा राग मनात ठेवून राजेश जवळकर याने गोरक्ष जवळकर यांच्याशी वाद घातला. गोरक्ष व  यांचा मुलगा हितेश या दोघांना शिवीगाळ करुन हाताने व दगडाने मारहाण करुन दुखापत केली. पोलीस उपनिरीक्षक डंबाळे तपास करीत आहेत.

You may have missed