Pune Crime News | सोसायटी मेंटेन्सन देण्याबाबत विचारणा केल्यावर बिल्डरच्या मेव्हण्याने चेअरमनच्या डोक्यात घातला दगड; मांजरीमधील रॉयल रेसिडन्सीमधील घटना

Marhan1

पुणे : Pune Crime News | बिल्डरने बांधलेल्या इमारतीतील एक फ्लॅट न विकता तो आपल्या मेव्हण्याला राहण्यास दिला. हा मेव्हणा सोसायटीचा मेन्टेनन्स देत नाही. चेअरमन यांनी त्याला मेन्टेनन्स बाबत विचारणा केल्यावर त्याने व त्याच्या मेव्हण्याने चेअरमनच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले.

प्रमोद सुखदेव ओव्हाळ (वय ३८, र. रॉयल रेसिडेन्सी, झेड कॉर्नर, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कामील शेख व त्याचा मेव्हणा (रा. रॉयल रेसिडेन्सी, मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ हा प्रकार २० एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या सोसायटीत घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉयल रेसिडन्सी ही इमारत रियाज पठाण यांनी २०१७ मध्ये बांधली आहे. या इमारतीत २० फ्लॅट असून बिल्डर रियाज पठाण यांनी फ्लॅट नं. १०४ हा विकलेला नसून सध्या त्या फ्लॅटमध्ये त्यांचा मेव्हणा कामिल शेख रहात आहे. फिर्यादी हे सोसायटीचे चेअरमन असून ते फ्लॅटचे मेन्टेनन्स गोळा करतात. मागील ६ महिन्यांपासून कामीन शेख यांनी मेन्टेनन्स दिलेला नाही. फिर्यादी हे २० एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता कामावरुन घरी येत असताना बिल्डिंगच्या गेटसमोर कामील शेख व त्याचा मेव्हणा भेटला. त्यावेळी फिर्यादी यांनी मेन्टेनन्सबाबत कमील शेख याला विचारले. त्यांनी फिर्यादीसोबत वाद घातला. यावेळी फिर्यादी व कामील शेख यांच्यामध्ये झटापट झाली. तेव्हा कामील शेख याच्या मेव्हण्याने जमिनीवर पडलेला दगड उचलून फिर्यादी यांच्या डोक्यात मारला. तेव्हा फिर्यादी हे मोठ्याने ओरडले. त्यांचा आवाज ऐकून त्यांची बहिण सोनी ओव्हाळ, पत्नी उमा ओव्हाळ, आई लिलाबाई, मोठी बहिण वैशाली शिंदे हे सर्व गेटवर आले. त्यावेळी फिर्यादी यांच्या बहिणीने जाब विचारल्यावर त्यांनी बहिणीला धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. त्यानंतर सोसायटीतील लोकांनी त्यांच्यातील भांडणे सोडविल्याने ते निघून गेले. पोलीस अंमलदार मानकर तपास करीत आहेत.

You may have missed