Pune Crime News । वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवुन खंडणी उकळणार्‍या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी केले जेरबंद

Pune Crime News | Bundgarden police arrest four people for extorting money from passenger's wife to celebrate birthday

पुणे : Pune Crime News । स्वारगेटहून पुणे स्टेशनला घेऊन जाताना शेअर रिक्षातील चौघांनी प्रवाशाला मारहाण करुन पत्नीकडून २५ हजार रुपये मागवून घेऊन लुटणार्‍या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.

गणेश आण्णा जगधने Ganesh Anna Jagdhane (वय २९), अमोल उत्तम गायकवाड Amol Uttam Gaikwad (वय ३२), अतुल रवींद्र  गायकवाड Atul Ravindra Gaikwad (वय ३८) आणि संतोष राधाकिसन सरोदे Santosh Radhakisan Sarode (वय ३१, सर्व रा. डायस प्लॉट कॅनॉल, गुलटेकडी) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत.

याबाबत धनिष कुमार हेरंद्र प्रसाद (वय २२, रा. डेक्कन, मुळ रा. बिहार) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा गावाकडील सत्येंद्र महतो (वय ४१, रा. शंकरपूर टोला, चकीया, सिवान, बिहार) हा मित्र असून तो मागील एक वर्षांपासून सेंट्रींगचे काम करतो. सत्येंद्र महतो हा गावी जाण्यासाठी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता स्वारगेटवरुन पुणे स्टेशनला जात होता. त्यावेळी एका रिक्षाचालकाने पुणे स्टेशनला जायचे आहे का म्हणून विचारले. ते रिक्षात बसल्यावर आणखी तिघे जण रिक्षात बसले. काही अंतर गेल्यावर तिघांनी मारहाण करुन पैसे मागितले. पैसे नाही, म्हटल्यावर बायकोकडून पैसे मागविण्यास सांगितले. त्यांनी बायकोला फोन लावल्यावर या चोरट्याने तुमच्या नवर्‍याने माझा फोन फोडला. भरपाई म्हणून २५ हजार रुपये द्या, नाहीतर त्याला मारतो, असे सांगितले. घाबरुन बायकोने त्याने पाठविलेल्या स्कॅनरवर २५ हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्यांना सोडून दिले. त्याची गावी जाण्यासाठी रेल्वे असल्याने तो गावी गेल्यावर फियार्दी यांनी तक्रार दिली होती.

बंडगार्डन पोलिसांनी तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयितांचा गुलटेकडी परिसरात शोध घेतला. त्यातून गणेश जगधने, अमोल गायकवाड यांना पकडले. त्यांच्याकडील चौकशीतून अन्य दोघांना पकडले. त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली रिक्षा व गुन्ह्यातील खंडणीचे १० हजार रुपये जप्त केले आहेत. अधिक चौकशीत त्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रवाशाला लुटल्याचे सांगितले.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त संगिता आल्फान्सो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केली आहे. 

You may have missed