Pune Crime News | पुणे शहरात घरफोडीचे सत्र सुरुच; घरफोडीच्या घटनांमध्ये रोख रक्कम, सोने-हिऱ्याचे दागिने लंपास

burglary

पुणे : Pune Crime News | पुणे शहरामध्ये घरफोडीचे सत्र सुरुच असून दोन दिवसांत कर्वे रोड, महम्मदवाडी, वाघोली भागात घरफोडी तर विश्रांतवाडी मध्ये वाईन शॉप लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी डेक्कन (Deecan Police Station), समर्थ (Samarth Police Station), लोणीकंद (Lonikand Police Station) आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (House Burglary In Pune)

कर्वेरोडवरील दाणे बंगला कुलूप लावून बंद होता. चोरट्याने बंगल्याचे लोखंडी गज वाकवून घरात प्रवेश केला. घरातील बेडरुममधील कपाटात ठेवलेले 13 लाख 85 हजार रुपये किमतीचे सोन्याचे, हिऱ्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 7 जुलै रोजी रात्री सव्वा सात ते 8 जुलै सकाळी 11 वाजण्याच्या कालावधीत घडली आहे. याबाबत 84 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

महम्मदवाडी येथील आशीर्वाद पार्क येथे 7 जुलै रोजी सकाळी साडे नऊ ते रात्री आठ या दरम्यान दुसरी घरफोडीची घटना घडली. याबाबत एका 46 वर्षीय व्यक्तीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरटयांनी फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप कशाच्या साहाय्याने उचकटून त्याद्वारे आत प्रवेश केला. चोरट्याने बेडरूमच्या कपाटातील 3 लाख 50 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

विश्रांतवाडी मध्ये चोरट्यांनी वाईन्स शॉपमधून 2 लाख 79 हजार 845 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना 8 जुलै रोजी रात्री दहा ते 9 जुलै रोजी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या दरम्यान अनुराग कॉम्प्लेक्स मधील राज वाईन्स मध्ये घडली आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील ड्रॉव्हरमधील रोख रक्कम, 181 वाईनच्या बॉटल, सीसीटीव्ही कॅमेरा, डीव्हीआर असा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत 56 वर्षीय व्यक्तीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घरफोडीची चौथी घटना वाघोली परिसरात घडली आहे.
घराला कुलूप लावून मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेल्यानंतर चोरट्याने डुप्लिकेट चावीने घर उघडले.
घरातील कपाटात ठेवलेले सव्वा लाख रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरट्याने चोरून नेले.
हा प्रकार 8 जुलै रोजी सकाळी साडे नऊ वाजता वाघोली येथे घडला आहे.
याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

You may have missed