Pune Crime News | बँकेला परस्पर व्हॉट्सअॅप कॉल करुन कंपनीचा बँक खात्याचा मोबाईल क्रमांक बदलून बनावट सहीचा वापर करुन व्यवसायिकाला 19 लाखांना घातला गंडा
पुणे : Pune Crime News | कंपनीच्या बँकेला व्हॉट्सअॅप कॉल करुन बनावट सहीचा वापर करुन बँकेला ई मेल करुन मोबाईल क्रमांक बदलून सायबर चोरट्यांनी व्यवसायिकाला १९ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत माणिकबाग येथील एका ५९ वर्षाच्या व्यावसायिकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १६ ते २४ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असून त्यांचा खासगी व्यवसाय आहे. त्यांच्या कंपनीची दॉइश बँकेत खाती आहेत. त्यांच्या कार्यालयात अकाऊंटचे काम पाहणार्या लेखापालाने त्यांनी फोन करुन सांगितले की, बँकेला व्हॉट्सअॅप व्हॉईस कॉलद्वारे कळविण्यात आले की त्यांचे नाव सांगून बँक खात्याबाबत अधिक चौकशी करीत होते. बँक कर्मचार्यांना संशय वाटल्याने त्यांनी फोन करुन सांगितले. फिर्यादी यांनी कार्यालयातील कर्मचार्यास सर्व कागदपत्रे तपासण्यास सांगितले. १९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी त्यांच्या ईमेल बॉक्सच्या ट्रॅश बॉक्समध्ये एक संशयित ई मेल दिसला. त्यात कार्यालयाचे कनेक्टेड बँकेला लिंक मोबाईल क्रमांक बदलण्याबाबतचा मजकुर होता. फिर्यादी हे बाहेरगावी असल्याने त्यांना कर्मचार्याला बँकेला सांगण्यास सांगितले. तोपर्यंत बँक बंद झाली होती. त्यांच्या नावाने कोणीतरी फिर्यादीच्या नावाचा, सहीचा व कार्यालयाच्या ई मेल आय डीचा गैरवापर करीत आहे़, असे बँकेला सांगितले. बँकेने त्यांना तसे पत्र मागितले. फिर्यादी बाहेरगावी असल्याने तसे पत्र देता आले नाही.
२४ डिसेंबर २०२५ रोजी कार्यालयातील कर्मचारी इतर कर्मचारी यांचे पेमेंट प्रोसेस करण्याकरीता कार्यालयाच्या रजिस्टर्ड मोबाईलवर ओटीपी आले नाही, म्हणून त्यांना संशय आला. त्यांनी बँकेचे कर्मचारी शैलेश गायकवाड यांना फोनद्वारे संपर्क करुन विचारणा केली. त्यांनी बँकेचे काम सुरळीत सुरु असल्याचे सांगितले. कर्मचार्याने कंपनीचा ई मेल चेक केला असता त्यांच्या नावाने दॉइश बँकेतील मोबाईल क्रमांक बदलला होता. बँक खात्यामधून ट्रान्झॅक्शन झाल्याचे ई मेल आले होते. त्यांनी बँकेत चौकशी केली. तेव्हा त्यांच्या बँक खात्यातून २४ डिसेंबर रोजी ५ लाख १० लाख व ४ लाख रुपये असे ३ व्यवहार करुन स्टेट बँकेच्या वेगवेगळ्या तीन खात्यात १९ लाख रुपये परस्पर ट्रान्सफर केल्याचे दिसून आले. त्यांनी २४ डिसेंबर रोजी तात्काळ सायबर क्राईमचे ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदविली. त्यानंतर आता सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर तपास करीत आहेत.
