Pune Crime News | क्यु आर कोड बदलून मॅनेजरनेच घातला गंडा ! कोंढव्यातील अलिचीज रेस्टॉरेंटमधील घटना, सीसीटीव्हीतून संशय बळावला

QR Coad Scam

पुणे : Kondhwa Pune Crime News | आजकाल सर्व जण ऑनलाईन पेमेंट करतात. त्यासाठी क्यु आर कोड स्कॅन करुन पैसे दिले जातात. कोंढव्यातील अलिचीज रेस्टॉरंटमधील मॅनेजरने मालकाने लावलेले क्यु आर कोड (QR Coad Scam) काढून त्याजागी आपल्या बँक खात्याचे क्यु आर कोड लावून तब्बल ३ लाख रुपयांना गंडा घातला.

मोनु सॅम्युअल (वय ३४, रा. अ‍ॅस्टर मायरा सोसायटी, पिसोळी) असे गुन्हा दाखल झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. याबाबत अहमद मोहम्मदअली अलीची (वय ४८, रा. उंड्री) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना उंड्रीमधील अलिचीज रेस्टॉरंटमध्ये (Alichi’s Irani Chai & Maska Undri) डिसेंबर २०२३ ते जून २०२४ दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमद यांचे उंड्रीत अलिचीज रेस्टॉरंट आहे. ते दुबईला गेले होते. त्या काळात त्यांचा भाऊ रेस्टॉरंटचा कारभार पहात होता. त्याचे डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने काही काळ ते नियमित रेस्टॉरंटमध्ये येऊ शकत नव्हते. मोनु सॅम्युअल हा मॅनेजर म्हणून काम पहात होता. रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना पैसे देण्यासाठी अहमद यांच्या बँकेचे क्युआर कोड लावले होते. त्यातील काही क्युआर कोड मोनु याने बदलून त्या जागी आपल्या विविध बँक खात्याचे क्यु आर कोड लावले. रेस्टॉरंटमध्ये आलेल्या काही ग्राहकांना तो आपल्या क्यु आर कोडवरुन पेमेंट करायला सांगत असे. ऑनलाईन पेमेंट केले की ते अहमद यांच्या खात्यात जाण्याऐवजी मोनुच्या खात्यात जात होते. (Pune Crime News)

रेस्टॉरंटचा धंदा चालत नसल्याचे सांगून मोनु त्यांच्याकडे उलट पैसे मागू लागला होता.
तेव्हा त्यांनी सीसीटीव्ही चेक केले.
त्यात रेस्टॉरंटमध्ये तर ग्राहकांची संख्या चांगली दिसत असताना प्रत्यक्षात गल्ला कमी कसा, असा प्रश्न पडला.
तेव्हा त्यांनी नेहमीच्या काही ग्राहकांना विचारल्यावर त्यांनी पूर्वी ऑनलाईन पेमेंट केल्यावर रेस्टारंटचे नाव यायचे आता मोनुचे नाव येते असे सांगितले.
त्यानंतर त्यांनी चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
गेल्या काही महिन्यात मोनु याने तब्बल ३ लाख रुपयांना गंडा घातला असल्याचे आढळून आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे (API Amit Shete) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक

BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

Leopard In Malthan Pune | पुणे: मलठण येथे बिबट्या जेरबंद

You may have missed