Pune Crime News | दुचाकी टोईग करुन नेल्याने तरुण-तरुणींनी घातला गोंधळ ! कारवाई टाळण्यासाठी लावली होती बनावट नंबरप्लेट

CRIME

पुणे : Pune Crime News | नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी टोईग करुन आणल्यानंतर तरुणतरुणीने डेक्कन वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर (Deccan Traffic Division) गोंधळ घातला. वाहतूक अडवून ठेवली. सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार यांना शिवीगाळ करुन नोकरी घालविण्याची धमकी दिली. त्याचवेळी दुचाकीवर बँकेची, तसेच पोलीस कारवाई टाळण्यासाठी बनावट नंबरप्लेट (Fake Number Plate) लावल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद डोंगरे (API Prasad Dongre) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गणेश कोंडीभाऊ सहाणे आणि सोनम सहाणे (दोघे रा. वाघारे कॉलनी, मोरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांनी दोन दुचाकी टोईग करुन मॉडर्न कॉलेजसमोरील डेक्कन वाहतूक विभागाच्या आवारात आणल्या होत्या. या कारवाईचा त्यांना राग आला. तसेच या दुचाकींवरील प्रलंबित दंड पेड न करण्याच्या उद्देशाने त्यांनी डेक्कन वाहतूक विभाग कार्यालयाच्या आवारात व विभागाच्या समोरील सार्वजनिक रोडवर गोंधळ घातला. रोडवरील वाहतूक अडवून ठेवली. वाहतूक पोलीस समजाविण्यास गेले असता सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद डोंगरे व पोलीस अंमलदार यांना वाईट वाईट बोलून नोकरी घालविण्याची धमकी दिली. सरकारी कर्तव्य करण्यास अटकाव केला.

गणेश सहाणे याने त्याच्या दुचाकीवर बँकेची तसेच पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी जाणीवपूर्वक बनावट वाहन क्रमांक लावून
बनावटीकरण करुन शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे (Rajkumar Kendre) तपास करीत आहेत. (Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed