Pune Crime News | कार्डिओ ब्रॉन्डस कंपनीच्या बनावट जिन्स पँट विक्रीस ठेवणार्‍या दुकानावर ‘रेड’, ‘द बीग ब्रँड फॅक्टरी’ स्टोअर्सच्या मालकावर गुन्हा दाखल

The Big Brand Factory Stores

पुणे : Pune Crime News | दिवाळी सणानिमित्त होणार्‍या गर्दीत बनावट माल विक्री करण्याचा प्रयत्न अनेक जण करत असतात. रविवार पेठेतील एका दुकानदाराने कार्डिओ ब्रॉन्डस मार्केटिंग या कंपनीच्या मफ्ती या ब्रँडच्या बनावट जिन्स पॅन्ट विक्रीला ठेवून ग्राहकांची फसवणुक (Cheating Fraud Case) करण्याचा प्रयत्न केला. फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police Station) द बीग ब्रँड फॅक्टरी स्टोअर्सच्या (The Big Brand Factory Stores Pune) मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

उमर मुक्तीयार चष्मावाला (वय ३४, रा. हादिया हाईटस, मिठानगर, कोंढवा) असे या दुकानदाराचे नाव आहे. यांच्या दुकानातून ७९ हजार १७८ रुपयांच्या जीन्स पँट जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत महेंद्र सोहनसिंग देवरा (वय ३६, रा. बाली, जि. पाली, राजस्थान) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ब्राँड प्रोडक्टर्स इंडिया या गुरगाव येथील कंपनीचे महाराष्ट्राचे फिल्ड ऑफिसर म्हणून काम पाहतात. रविवार पेठेतील द बिग ब्रॉन्ड फक्टरी स्टोअर्स या दुकानाची पाहणी करत असताना त्यांना कार्डिओ ब्रॉन्डस मार्केटिंग (मफ्ती) कंपनीच्या बनावट लोगोचा वापर करुन पॅन्ट विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्यांनी पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल (Sandeep Singh Gill) यांच्याकडे कारवाईसाठी अर्ज केला होता. त्यांनी फरासखाना पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.

फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड (API Vaibhav Gaikwad),
सहायक फौजदार मोकाशी, हवालदार शिंदे, पोलीस अंमलदार राठोड, जाधव, सोनुने, होळकर हे द बिग ब्रॉन्ड फक्टरी स्टोअर्स येथे गेले.
दुकानदाराने कार्डिओ ब्रॉन्डस कंपनीचा मफ्ती शर्ट दाखविला. त्या शर्टची पाहणी केल्यावर तो बनावट असल्याचे दिसून आले.
तसेच जिन्स पँटही बनावट असल्याचे दिसून आले. दुकानात पाहणी करुन ७९ हजार १७८ रुपयांच्या कार्डिओ ब्रॉन्डस
या लोगो असलेल्या एकूण २२ जिन्स पँट जप्त करण्यात आल्या आहेत.
कॉपीराईट कायद्याचा उल्लंघन केल्याप्रकरणी उमर चष्मावाला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आह.
सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण