Pune Crime News | कार्यालयात लैंगिक छळ करणार्या आनंद राठी वेल्थ कंपनीचे कार्यकारी संचालक स्वपन चक्रवर्ती, सीईओ राकेश रावल, जॉईंट सीईओ फिरोज अजीज, एच आर हेड तेजल शाहसह पाच जणांवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | कामावर असताना महिलेशी लगड करण्याचा प्रयत्न करुन बळजबरी करुन आनंद राठी वेल्थ कंपनीचे कार्यकारी संचालक स्वपन चक्रवर्ती यांनी वारंवार विनयभंग केला. त्याची तक्रार सीईओ,एचआर हेड यांच्याकडे केल्यानंतरही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. महिलेने तक्रार करु नये, म्हणून तिला करीयर संपवुन टाकण्याची धमकी देऊन सुडबुद्धीने दुबईत बदली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी आनंद राठी वेल्थ कंपनीच्या पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
आनंद राठी वेल्थ कंपनीचे कार्यकारी संचालक स्वपन चक्रवर्ती (Swapan Chakraborty, Executive Director of Anand Rathi Wealth Company), सी ई ओ राकेश रावल (Anand Rathi Wealth Company’s CEO Rakesh Raval), जॉईंट सी ई ओ फिरोजी अजीज (Anand Rathi Wealth Company’s Firozi Aziz), एच आर हेड तेजल शाह (Anand Rathi Wealth Company’s Tejal Shah) आणि कार्यकारी संचालक सोनाली रावल (Anand Rathi Wealth Company’s Sonali Raval)अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ३३ वर्षाच्या महिलेने मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुण्यात मे २०२४ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान घडला असल्याने त्यांनी गुन्हा दाखल करुन तो शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
आनंद राठी वेल्थ लिमिटेड ही भारतातील एक आघाडीची बिगर बँक संपत्ती व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. वैयक्तिक आणि कॉपोरेट ग्राहकांना आर्थिक नियोजन, म्युच्युअल फंड वितरण आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा प्रदान करते. भारताबाहेर दुबई आणि युनायटेड किंगडम येथे त्यांच्या शाखा आहेत. कंपनीचे गणेशखिंड रोडवर मुख्य कार्यालय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आनंद राठी वेल्थ कंपनीमध्ये कामावर असताना कार्यकारी संचालक स्वपन चक्रवर्ती याने महिलेशी लगड करण्याचा प्रयत्न करुन वेळोवेळी विनयभंग केला. त्यानंतर तक्रार करु नये, म्हणून करीअर संपवून टाकीन अशी धमकी दिली. सातत्याने पाठलाग केला आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ केला. याबाबत त्यांची कार्यालयात तक्रार करुन सुद्धा आरोपीवर आजतागायत कोणतीही कारवाई केली नाही. स्वपन चक्रवर्ती याच्या चालू असलेल्या लैंगिक छळा बाबत इतरांना माहिती देऊन सुद्धा त्यांनी आरोपीकडे दुर्लक्ष करुन स्वपन चक्रवर्ती याला प्रोत्साहन देऊन कामाच्या ठिकाणी फिर्यादी यांचा अपमान केला. त्यांची सुडबुद्धीने दुबई येथे बदली केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
