Pune Crime News | कामगाराच्या होरपळून मृत्यु प्रकरणी धनकवडीतील साईबा अमृततुल्यच्या मालकावर गुन्हा दाखल (Videos)

Saiba Hotel

पुणे : Pune Crime News | सातारा रोडवरील अहिल्यादेवी चौकातील चहाच्या दुकानाला लागलेल्या आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यु झाला. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी साईबा अमृततुल्य (Saiba Amruttulya) हॉटेलच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

https://www.instagram.com/p/DH0tIaBpJhf

केशव श्रीमंत जाधव Keshav Shrimant Jadhav (वय २८, रा. भिंताडे अपार्टमेंट, शेलार मळा, कात्रज कोंढवा रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या मालकाचे नाव आहे. या आगीत संतोष श्रीसेन हेगडे (वय २६), याचा मृत्यु झाला होता.

https://www.instagram.com/p/DH0xKdUpCXm

याबाबत प्रसाद कृष्णहरी केंची (वय ३०, रा. मानसरोवर अपार्टमेंट, आनंदनगर, सुखसागर नगर) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police) फिर्याद दिली आहे.

साईबा हॉटेलमध्ये रविवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. आगीची वर्दी मिळताच कात्रज व गंगाधाम अग्निशमन केंद्रातील गाड्या घटनास्थळी पोहचल्या. आतमध्ये एक कामगार अडकला असल्याची माहिती मिळताच जवानांनी पाण्याचा मारा करुन जखमी अवस्थेत या कामगाराला बाहेर काढले. या आगीची झळ शेजारील फिर्यादीच्या क्लेझंट होम डेकोर दुकान व कपड्यांच्या दुकानाला पोहचून त्यात त्यांच्या दुकानातील साहित्य व फर्निचर जळून खाक झाले.

साईबा अमृततुल्य या चहाच्या दुकानात दुध तापवत असताना वायू गळती झालेल्या सिलेंडरमुळे ही आग लागली. त्यावेळी संतोष हेगडे या कामगाराला बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यु झाला. अमृततुल्यमध्ये एकूण ८ सिलेंडर होते. त्यापैकी ३ सिलेंडरमधून वायुगळती झाल्याचे अग्निशमन दलाच्या तपासणीत निष्पन्न झाले. अग्निशमन दलाने सुरक्षिततेच्या कारणास्तव हे सिलेंडर ताब्यात घेतले आहेत. दुकानात कोणतीही सुरक्षाविषयक उपाय योजनाची काळजी न घेतल्याने पोलिसांनी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण तपास करीत आहेत.

You may have missed