Pune Crime News | कामगारांच्या PF ची 1 कोटी 95 लाखांची रक्कम जमा न करता अपहार केलेल्या विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेच्या संचालकांवर गुन्हा दाखल

Fraud

पुणे : Pune Crime News | कामगारांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करुन ती खात्याकडे जमा न करता १ कोटी ९५ लाख रुपयांचा अपहार करणार्‍या विशाल एक्सपर्ट प्रा. लि. (Vishal Expert Pvt. Ltd.) या कंपनीच्या संचालकावर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Cheating Fraud Case)

याबाबत भविष्य निर्वाह निधी खात्याच्या भविष्य निधी निरीक्षक दिपाली तिळवणकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संचालक शिवानी सुहास जरांगे, अतिरिक्त संचालक बाली हंग सुब्बा, तुषार श्रीरंग लांडे पाटील, श्रीरंग लांडे पाटील, सविता श्रीरंग लांडे पाटील, सतिश छगन ढवळे (सर्व रा. रासमिराज अपार्टमेंट, शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल एक्सपर्ट सर्व्हिस प्रा. लि. या कंपनीचे त्यांच्याकडील कर्मचारी पगार पत्रकामध्ये काही कर्मचारी यांच्या जुलै २०२२ ते डिसेंबर २०२४ दरम्यान कर्मचार्‍यांच्या मासिक पगारातून ९३ लाख ९० हजार ४७५ रुपये भविष्य निर्वाह निधी कपात केलेले आढळून आले. परंतु ती रक्कम त्यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा न केली नाही. कर्मचार्‍यांच्या पगारातून कपात केली जाते, तेवढी रक्कम म्हणजे ९३ लाख ९० हजार ४७५ रुपये कंपनीच्या मालकांनी कर्मचार्‍यांच्या निधीमध्ये भरावयाची असते. या रक्कमेवरील इतर चार्जेस असे मिळून एकूण १ कोटी ९५ लाख ६३ हजार ४९० रुपये भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा न करताा ती स्वत:चे फायद्यासाठी वापरुन कर्मचार्‍यांचा विश्वासघात करुन फसवणूक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे तपास करीत आहेत.

You may have missed