Pune Crime News | पिंपरी चिंचवड पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत कॉपी करणार्या तरुणींवर गुन्हा दाखल; जिन्स पॅन्टचे खिश्यात मिळाल्या दोन चिठ्ठ्या
पुणे : Pune Crime News | पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या पोलीस भरतीतील लेखी परीक्षेदरम्यान कॉपी करणार्या महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अनुजा दिलीप चव्हाण Anuja Dilip Chavan (वय २५, रा. उंडाळे, ता. कराड, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार अर्चना नवनाथ सस्ते यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ताथवडे येथील श्री बालाजी युनिर्व्हसिटी येथे रविवारी सकाळी पावणेदहा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात २०२४ -२५ पोलीस भरती सुरु आहे. त्यात रविवारी श्री बालाजी युनिर्व्हसिटी येथे लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी परीक्षा केंद्रात प्रवेश केल्यावर परीक्षा कक्षात प्रवेश करण्यापूर्वी कोणतेही साहित्य ज्याचा कॉपी किंवा गैरकृत्य करण्यासाठी उपयोग होईल असे साहित्य परीक्षा केंद्रामध्ये आणण्यास सक्त मनाई आहे. असे असताना सकाळी पावणे दहा वाजता केलेल्या तपासणीमध्ये या तरुणीने परीक्षेत गैरव्यवहार करण्याच्या उद्देशाने परीक्षेशी संबंधित असलेल्या विषयांची उत्तरे तिने घातलेल्या जिन्स पॅन्टचे खिश्यात दोन चिठ्ठ्या मिळाल्या. तसेच जिन्स पॅन्ट व टॉपवर लिहून आलेले मिळून आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस आयुक्त कुराडे तपास करीत आहेत.
