Pune Crime News | जामीनास विरोध न करता गुन्हे मागे घेण्यासाठी महिलेला मारहाण करणार्यांवर अॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | पूर्वी झालेल्या भांडणातील गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अटक केलेल्याच्या जामिनाला विरोध करु नये, तसेच ते गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी दबाव आणून महिलेला मारहाण करणार्या तिघांविरुद्ध मांजरी पोलिसांनी अॅट्रोसिटी खाली गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ५० वर्षाच्या महिलेने मांजरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सोनी मोहन चव्हाण, सिमरन मोहन चव्हाण, प्राडी गौड (सर्व रा. घरकुल, मांजराई मंदिराशेजारी, मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार घरकुल येथे १२ जानेवारी रोजी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याने यापूर्वी पोलिसांनी मोहन चव्हाण याला अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. फिर्यादी या घराचे शेजारी असलेल्या नळावरुन पिण्याचे पाणी आणण्याकरीता गेल्या होत्या. त्यावेळी आरोपींनी त्यांना मोहन चव्हाण याच्या जामीनास विरोध करु नये. तसेच त्याचेवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी दबाव आणला. त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी हत्याराने हातावर जखम केली. त्यांचा मोबाईल फोडून नुकसान केले. जातीवाचक शिवीगाळ केली. सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले तपास करीत आहेत.
