Pune Crime News | अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाच्या चंदननगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. मुलीच्या मावशीने त्याला विरोध केल्यावर त्याने तिचे न्युड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. चंदननगर पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.

ऋतिक रावसाहेब लोणके Hrithik Raosaheb Lonke (वय २६, रा. सोमनाथनगर, पठारे वस्ती,  खराडी रोड, चंदननगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत एका १६ वर्षाच्या युवतीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ११ डिसेंबर २०२४ पासून फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरु होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतिक लोणके याने या अल्पवयीन मुलीला ‘‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण लग्न करणार आहे,’’ सांगून तिची इच्छा नसतानाही तिच्याशी वारंवार जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. तिच्या मावशीने त्याच्याशी बोलण्यास मनाई केल्यावर त्याने मावशीला ‘‘मला तिच्याबरोबर बोलु दिले नाही तर मी माझ्याकडे असलेले न्युड फोटो व्हायरल करेन,’’ अशी धमकी दिली. त्यानंतर या युवतीने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार केली. सहायक पोलीस निरीक्षक धुर्वे तपास करीत आहेत.

You may have missed