Pune Crime News | मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्या स्पावर चतु:श्रृंगी पोलिसांचा छापा; स्पा मालकाला अटक करुन तीन तरुणींची केली सुटका
पुणे : Pune Crime News | औंध येथे मसाज सेंटरच्या नावाखाली उत्तर प्रदेश, दिल्लीतील तरुणींकडून वेश्या व्यवसाय केला जात असल्याचे चतु:श्रृंगी पोलिसांनी घातलेल्या छाप्यामध्ये आढळून आले. स्पा मालकाला अटक करुन पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली.
अजिम उद्दीन Ajim Uddin (वय २२, रा. हिंजवडी फेज १) असे अटक केलेल्या स्पा मालकाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार नितीन विलास चौधरी यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई औंध येथील गायकवाड पेट्रोल पंपाजवळील अॅस्टल कोर्ट इमारतीतील डेनिम थाई स्पा येथे ११ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध येथील डेनिम थाई स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. या माहितीनुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक तेथे पाठविला. ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी डेनिम थाई स्पावर छापा टाकला. तेथे अजिम हा तीन तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतल्याचे आढळून आले. या तरुणी उत्तर प्रदेश, दिल्ली येथील राहणार्या आहेत. पोलिसांनी या तीन तरुणींची सुटका केली. गेल्या १५ दिवसांपासून हा स्पा सुरु केल्याचे अजिम सांगत आहे. पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे तपास करीत आहेत.
