Pune Crime News | पॅसेजर घेण्यावरुन रिक्षाचालकांमध्ये हाणामारी; रस्त्यावर पडून हात फ्रॅक्चर
पुणे : Pune Crime News | रिक्षास्टँडवर रांगेत पॅसेजर घेण्यावरुन दोघा रिक्षाचालकांमध्ये हाणामारी झाली. त्यात एकाने दुसर्याला धक्काबुक्की करुन ढकलून दिल्याने त्याचा हात फ्रॅक्चर झाला.
याबाबत दिपक हनुमंत जाधव (वय ४४, रा. पीएमसी कॉलनी, गोखलेनगर) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा जाधव (वय ४२, रा. वैदुवाडी)याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सेनापती बापट रोडवरील पॅव्हेलियन मॉल (Pavilion Mall Pune) गेटवर रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे रिक्षाचालक आहेत. फिर्यादी हे रिक्षास्टँडवर रिक्षामध्ये पॅसेंजर घेण्यास रिक्षा नंबरला लावून थांबले होते. त्यावेळी कृष्णा जाधव याने फिर्यादीचे रिक्षाजवळ येऊन आम्ही येथे कशाला थांबलो आहे, असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
तेव्हा फिर्यादी रिक्षातून खाली उतरुन त्यास पॅसेंजर तुझ्या रिक्षात घेऊन जा, असे सांगितले.
त्यावर कृष्णा याने फिर्यादीस मारहाण करुन जोरात धक्काबुक्की केली.
फिर्यादी यांना रस्त्यावर जोरात ढकलून दिल्याने ते रस्त्यावर पडले.
खाली पडल्याने त्यांच्या डाव्या हाताचे मनगटाला फ्रॅक्चर झाले आहे. पोलीस नाईक दहातोंडे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACP Satish Govekar | सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर