Pune Crime News | दाऊद आणि बिष्णोईचे फोटो स्टेटसला ठेवून वादग्रस्त वक्तव्य; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि लारेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) याचे फोटो स्टेटसला ठेवून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य मोबाईलवर ठेवणार्या तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) गुन्हा दाखल केला आहे.
अमीर इनामदार (रा. इनामदार वस्ती, लोणी काळभोर), अरबाज मणियार (रा. पाषाणकरबाग, लोणी काळभोर), जुबेर तांबोळी (रा. प्राचीन शिवालयाजवळ, लोणी काळभोर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत लोणी काळभोरमधील एका ४० वर्षाच्या नागरिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना मोबाईलवर पाहिले असताना आरोपींनी त्यांच्या मोबाईलवर दाऊद इब्राहिम व लॉरेन्स बिष्णोई यांचे फोटो स्टेटसला लावले होते.
त्या फोटोवर दोन समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर लिहिला होता.
या मजकूरामुळे धार्मिक, अगर जातीमध्ये एकोपा टिकण्यास बाधक व सार्वजनिक शांतता बिघडवण्यास संभवनीय
अशी कृती केली असल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Politics News | उद्धव ठाकरे फडणवीसांची भेट? अमित शहांना राऊतांचा फोन?
या चर्चेवर काँग्रेसचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘आमच्यात भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न’
Mumbai High Court News | ’50 खोके एकदम ओके’ ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले;
सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच – हायकोर्टाचे निरीक्षण