Pune Crime News | खुनाचा कट रचून गावठी पिस्टल बाळगणार्‍या वाँटेड शेकापूरे टोळी प्रमुखासह तिघांना गुन्हे शाखेच्या पथकांनी केले जेरबंद

Pune Crime News | Crime Branch teams arrest three including wanted Shekapur gang leader for plotting murder, carrying a village pistol

पुणे : Pune Crime News | विरोधी टोळीतील व्यक्तीचा खुनाचा कट रचून त्यासाठी पिस्टल मिळवून साथीदारांची जुळवा जुळव करत असल्याची माहिती मिळाल्यावर खंडणी विरोधी पथकाने शेकापूरे टोळीतील तिघांना पिस्टलासह पकडले होते. तेव्हापासून फरार असलेल्या शेकापूरे टोळीचा प्रमुखासह गुन्हे शाखेने तिघा सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.

अमित मल्लिकार्जुन शेकापूरे Amit Mallikarjun Shekapure (वय २५, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. उमाप टोळीने केलेल्या गोळीबारात अमित शेकापूरे याचा भावाच्या पाठीत गोळी लागली होती. मार्केटयार्ड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन उमाप टोळीतील गुन्हेगारांना पकडले होते. भावावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी शेकापूरे टोळीकडून खुनाचा कट रचला होता. याची माहिती मिळाल्यावर खंडणी विरोधी पथकाने १३ मार्च रोजी पिस्टलासह तिघांना पकडले होते. तेव्हापासून अमित शेकापूरे फरार होता. या आरोपीची माहिती पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवार पेठेतील वृंदावन आइस्क्रिमसमोर २ एप्रिल रोजी अमित शेकापूरे याला पकडले.

या गुन्ह्यातील फरारी दुसरा आरोपी निखिल ज्ञानोबा लगाडे Nikhil Gyanoba Lagade (वय २३, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) हा गुलटेकडी परिसरात आला असल्याचे युनिट ५ चे पोलीस अंमलदार अकबर शेख व राहुल ढमढेरे यांना मिळाली. पोलीस निरीक्षक संदिपान पवार यांच्या सुचनेप्रमाणे २ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.

बेकायदेशीर जमाव जमवुन दंगल माजविल्याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेला गुन्हेगार गुलटेकडी येथे आला असल्याची माहिती युनिट २ चे पोलीस अंमलदार शंकर नेवसे, विनोद चव्हाण, उज्वल मोकाशी, विनायक वगारे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या सुचनेप्रमाणे पोलिसांनी अन्वर ऊर्फ जंबा शाकरी शेख (वय २३, रा. औद्योगिक वसाहत झोपडपट्टी, गुलटेकडी) याला सापळा रचून ३ एप्रिल रोजी अटक केली.

खुनाचा कट रचलेल्या गुन्ह्यात शेकापूरे टोळीचे तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक, युनिट २ व युनिट ५ च्या पथकाने दोन दिवसात अटक केली.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम राजमाने, संदीपान पवार, अश्विनी जगताप व त्यांच्या पथकाने केली आहे.

You may have missed