Pune Crime News | बसमध्ये लहान मुलांना घेऊन सोन्याचे दागिने चोरी करणार्‍या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या पथकाने केले जेरबंद, 6 महिलांकडून 89 हजारांचे दागिने केले जप्त

Pune Crime News | Crime Branch Unit 3 team arrests gang that stole gold jewellery by taking children in buses, jewellery worth Rs 89,000 seized from 6 women

पुणे : Pune Crime News |  बसमध्ये लहान मुलांना घेऊन सोन्याचे दागिने चोरी करणार्‍या महिला टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने जेरबंद केले आहे. टोळीतील ६ महिलांकडून ८९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड जप्त केली आहे.

अनुराधा ऊर्फ पार्वती मंगेश बुद्धिनाथ (वय ३०), अंजली राम बुद्धिनाथ (वय २१), राधा चरण वैद (वय २१), कल्पना बाला वैद (वय २१) आणि श्र्वेता उमर वैद (वय २१), जानकी अनिल वैद (वय ३०, सध्या रा. जातेगांव (खु) शिक्रापूर, ता. शिरुर, मुळ रा. मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

लहान मुलाच्या अंगावरील दागिने चोरुन नेल्याचा गुन्हा भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक समांतर तपास करीत होते. समांतर तपास करत असताना गुन्ह्यातील घटनास्थळापासून शिक्रापूरपर्यंत जाणारे वेगवेगळ्या रस्त्याच्या आजु बाजुचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. त्याच्या आधारे गुन्हा करुन परत जात असताना रिक्षा,  ट्रक असल्याचे निष्पन्न करुन तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच आधारे संशयित महिलांचा शोध सुरु होते. जातेगाव येथे या महिला राहत असल्याची माहिती मिळाल्यावर तेथे सापळा रचून या महिलांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी कबुली दिली. या महिलांकडून सोन्याचे व चांदीचे तसेच रोख रक्कम असा एकूण ८९ हजार ५०० रुपयां ऐवज जप्त केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, सहायक पोलीस निरीक्षक गोडबोले, पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोर्‍हाडे, सागर सूर्यवंशी, मनोज साबळे, सोनवाने, पोलीस अंमलदार गोनटे, स्वप्निल महाले, शशिकांत नांगरे, तुषार वराडे, समीर काळे, सुंदर थोरात, सुधीर दांगट, निखिल फापाळे, राजकुमार इघारे, भोर, सहायक पोलीस फौजदार माळी, हवालदार ननावरे, पोलीस अंमलदार कारके, हुलगे यांनी केली आहे.

You may have missed